Mitchell Johnson Statement On David Warner: माजी खेळाडूंनी केलेले विधान अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉनसन याने डेविड वॉर्नर याच्याविषयी खळबळजनक विधान केले आहे. खरं तर, जॉनसनने म्हटले आहे की, ‘वॉर्नरने त्याच्या कारकीर्दीत बॉल टॅम्पिरिंगसारखे कृत्य केले आहे. अशात मला वाटत नाही की, या खेळाडूला हिरोसारखा निरोप मिळाला पाहिजे.’
काय म्हणाला जॉनसन?
मिचेल जॉनसन (Mitchell Johnson) याने ‘द वेस्ट ऑस्ट्रेलियन’ या वृत्तपत्राच्या एका स्तंभात लिहिले की, “सन 2018मध्ये बॉल टेम्परिंगची घटना करणे आणि पुढे 1 वर्षांच्या बंदीनंतर डेविड वॉर्नर हिरोसारखी निरोप मालिका मिळवण्यास पात्र नाही. त्याला असा निरोप मिळाला नाही पाहिजे.”
जॉनसनने पुढे लिहिले की, “जसे की आपण डेविड वॉर्नरच्या निरोप मालिकेची तयारी करत आहोत. आपण असे का करत आहोत, हे कुणी मला सांगेल का, की एक संघर्ष करणाऱ्या कसोटी सलामी फलंदाजाला आपल्या निवृत्तीची तारीख स्वत: घोषित का करावी लागत आहे? तसेच, ऑस्ट्रेलिया क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांमध्ये सामील असणाऱ्या खेळाडूला हिरोप्रमाणे निरोप देण्याची काय गरज आहे?” जॉनसनने असे लिहीत ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
यानंतर जॉनसन असेही म्हणाला की, “असे असले, तरीही वॉर्नर सँड पेपरगेट प्रकरणात एकटा नव्हता. तो त्यावेळी संघाचा वरिष्ठ सदस्यही होता आणि एक व्यक्ती असा होता, जो नेतृत्व करण्यासाठीही ओळखला जात होता. त्याच्या कारकीर्दीतील मोठा डाग आहे. तरीही त्याला असा निरोप मिळणार, हा विचार करून मी हैराण आहे.”
रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानविरुद्ध होणारी कसोटी मालिका डेविड वॉर्नर (David Warner) याच्या कारकीर्दीतील अखेरची मालिका ठरू शकते. मात्र, वॉर्नरने याविषयी अद्याप मोकळेपणाने चर्चा केली नाहीये. तसेच, याची पुष्टीही केली नाहीये. मात्र, याविषयी चर्चा सुरू आहेत की, ही मालिका वॉर्नरच्या कारकीर्दीतील अखेरची कसोटी मालिका असेल.
खरं तर, पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (Australia vs Pakistan) संघात 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 14 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळला जाईल. (former australian pacer mitchell johnson on david warner says warner does not deserve a farewell test series know why)
पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ऍलेक्स कॅरे, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवूड, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नेथन लायन, मिचेल मार्श, लान्स मॉरिस, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेविड वॉर्नर ()
हेही वाचा-
‘जर द्रविडला एक्सटेन्शन हवे असेल तर देऊन टाका, नाही तर…’, हे काय बोलून गेला गौतम गंभीर?, वाचा
Abu Dhabi T10 League: भारतीय गोलंदाजाच्या ‘No-Ball’ने माजवली खळबळ, लावले जातायेत मॅच फिक्सिंगचे आरोप!