भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जाणार आहे. ज्याची सुरूवात (22 नोव्हेंबर) पासून होणार आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी पर्थच्या मैदानावर आमने-सामने असणार आहेत. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक इयान हिलीने (Ian Healy) विराट कोहलीला (Virat Kohli) बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये बाद करण्यासाठी सर्व पद्धती वापराव्यात असे वक्तव्य केले आहे.
विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही काळापासून कसोटी सामन्यांमध्ये संघर्ष करत आहे, त्याने मागील 60 कसोटी डावांमध्ये केवळ 11 अर्धशतकांसह 2 शतके झळकावली आहेत. कोहलीने ऑस्ट्रेलियात चमकदार कामगिरी केली आहे. त्याने 54च्या सरासरीने धावा केल्या आहेत. पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज त्रिकूटासह कोहलीवर दबाव आणण्याचा सल्ला इयान हीलीने दिला आहे.
इयान हिलीने (Ian Healy) ‘सेन रेडिओ’शी बोलताना सांगितले की, “मी पाहत असलेला पहिला ‘मॅचअप’ म्हणजे आमचे वेगवान गोलंदाज विराट कोहलीला कसे गोलंदाजी करू शकतात. मला वाटते की त्यांनी त्याच्या पुढच्या पॅडला सतत लक्ष्य केले पाहिजे. तो पुढचा पाय खूप वापरतो आणि तिथून कुठेही बॉल खेळू शकतो, तो स्क्वेअर ऑफ साइड आणि लेग साइडला बॉल खेळण्यासाठी पुढच्या पायाचा वापर करू शकतो. त्याच्याकडे अशा बॉलला बचावात्मक दृष्टीकोन स्वीकारण्याची क्षमता आहे. तो गतीसाठी उत्सुक असेल आणि आमचे गोलंदाज कदाचित समोरच्या पॅडला लक्ष्य करू शकतील.”
पुढे बोलताना हिली म्हणाला की, “आमच्या गोलंदाजांनी मात्र ही रणनीती जास्त काळ वापरणे टाळावे कारण त्याला आमची योजना समजण्यास मदत होईल. त्यांनी प्रत्येक चेंडूवर असे करू नये कारण कोहलीला याची सवय होईल, जर ही योजना कार्य करत नसेल तर त्याने कोहलीच्या शरीरावर निशाणा साधत गोलंदाजी करावी. या प्रकारच्या गोलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षकाला शॉट लेगवर ठेवून दबाव निर्माण केला पाहिजे, अशा परिस्थितीत तो दबावाला सामोरे जाण्यासाठी पुल शॉटचा वापर करेल, जे नियंत्रित करणे कठीण आहे. अशा स्थितीत त्याच्या शरीराला लक्ष्य करून गोलंदाजी करणे हा आपला दुसरा पर्याय असू शकतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS: विराट कोहलीचा हा शेवटचा ऑस्ट्रेलिया कसोटी दौरा, माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी
IPL 2025: हे खेळाडू आरसीबी मध्ये परतणार? हा सर्वात मोठा दावेदार!
कोहलीच्या खराब फॉर्मपासून ते गौतम गंभीरच्या फ्लॉप कोचिंगपर्यंत, टीम इंडियासाठी या 5 मोठ्या समस्या