ऑस्ट्रेलियन संघाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याने क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फिरकी गोलंदाजीने मोठमोठ्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवले आहे. मैदानात घातक गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेन वॉर्नने मैदानाबाहेर ‘चॉकलेट बॉय’ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. आता तो पुन्हा एकदा प्रेमाची नवीन इनिंग सुरू करताना दिसून येत आहे.
शेन वॉर्न आणि प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री मार्गो रॉबी या दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आल्याचे दिसून येत आहे. शेन वॉर्न सध्या या ऑस्ट्रेलियन अभिनेत्रीच्या फोटोंना लाईक करताना दिसून येत आहे. तसेच तो कमेंटदेखील करत आहे.
त्याने मार्गोच्या एका इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करत लिहिले की, “कीप रॉकिंग इट मार्गो.”
तर त्याने दुसऱ्या फोटोवर कमेंट करत लिहिले की, “ऑसी” म्हणजेच ऑस्ट्रेलियन. हे सर्व पाहून नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे की, या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजत आहे.
क्रिकेटचे मैदान गाजवलेल्या शेन वॉर्नने लवकरच मोठ्या पडद्यावर देखील झळकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तो एका चित्रपटात काम करतो आहे, जो त्याच्या आयुष्याशी निगडित आहे. तसेच शेन वॉर्नची इच्छा आहे की, मार्गोने त्याच्यासोबत या चित्रपटात त्याची पत्नी सिमोन कलाहानची भूमिका करावी.
क्रिकेटच्या मैदानात फिरकीचा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ५१ वर्षीय शेन वॉर्नने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत १४५ कसोटी सामने खेळले होते. यात त्याने तब्बल ७०८ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच १४५ वनडे सामन्यात २९३ विकेट्स आणि ५५ आयपीएल सामन्यात ५७ विकेट्सची कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
सुरेश रैनावर कोसळला दु:खाचा डोंगर, पत्नीला लहानाची मोठी करणाऱ्या ‘या’ व्यक्तीचे कोरोनामुळे निधन