मुंबई । बांगलादेशचा माजी खेळाडू नफीस इक्बालचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याची माहिती स्वतः नफीस याने दिली आहे. नफीस हा बांगलादेशचा सलामीचा फलंदाज तमीम इक्बालचा मोठा भाऊ आहे. त्याने चितगाव येथील घरामध्ये स्वतःला आयसोलेट केले आहे.
नफीसने 2003 साली बांगलादेश संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या 34 वर्षीय खेळाडूने 11 कसोटी सामन्यात 518 धावा केल्या आहेत तर 16 वनडे सामन्यात त्याच्या नावावर 309 धावांची नोंद आहे. तो 2005 मध्ये जेव्हा बांगलादेशने झिम्बाब्वेविरुद्ध पहिला कसोटी विजय मिळवला होता तेव्हा बांगलादेश संघाचा भाग होता. त्या सामन्यात त्याने पहिल्या डावात 56 धावांची खेळी केली होती.
पण फलंदाजीत सातत्य न दाखवल्यामुळे तो 2006 साली राष्ट्रीय संघातून बाहेर पडला. नफीसचा लहान भाऊ तमीम इक्बाल मात्र बांगलादेश क्रिकेट संघाकडून जोरदार कामगिरी करत आहे.
दुसरीकडे, पाकिस्तानातील तीन क्रिकेटपटूंना कोरोनाची बाधा झाली आहे. यात शाहिद आफ्रिदी, तौफिक उमर, जफर सरफराज या खेळाडूंचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिका मधील एका क्रिकेटपटूला देखील कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अनेक देशांनी क्रिकेटचे सामने अनिश्चित काळासाठी स्थगित केले आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनाच्या सावटात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिकेला पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे. तब्बल तीन महिन्यांनंतर ही पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका असणार आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
बीसीसीआयने या संघाला अजून दिले नाही बक्षीसाचे १ कोटी रुपये; या खेळाडूने उपस्थित केला प्रश्न
विराटला प्रपोज करणाऱ्या या महिला क्रिकेटपटूला खेळायचंय आरसीबीकडून
“मला पण रोहित शर्मासारखी फलंदाजी करायची आहे”