गेला आठवडाभर संकाटात सापडलेल्या चेन्नई सुपर किंग्ससाठी (सीएसके) नुकतीच चांगली बातमी आली आहे. त्यांच्या संघातील ऋतुराज गायकवाड आणि दीपक चाहरसह कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या १३ सदस्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून सीएसकेने सरावाला सुरुवात केली आहे.
एमएस धोनी कर्णधार असलेला सीएसके संघ दुबईतील आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये सराव करत आहे. दरम्यान अनेक रोमांचक गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. झाले असे की, धोनी सीएसकेचा गोलंदाज पियूष चावलाच्या गोलंदाजीवर नेट्समध्ये सराव करत होता. अशात चावलाने पहिल्याच चेंडूवर धोनीला त्रिफळाचीत केले. पण, धोनीने चावलाच्या दूसऱ्या चेंडूवर दमदार षटकार मारत त्याला प्रत्युत्तर दिले. सीएसकेने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. MS Dhoni And Piyush Chawla Video Of Nets Practice
चाहत्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर पसंती दशर्वली आहे. एका चाहत्याने या व्हिडिओला कमेंट करत लिहिले आहे की, “माहीला बोल्ड करणारा हा गोलंदाज कोण आहे?”
https://www.instagram.com/tv/CEwuIsFFVlT/?utm_source=ig_web_button_share_sheet
धोनीची आतापर्यंतची आयपीएल कारकिर्द दमदार राहिली आहे. त्याने आतापर्यंत १९० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४२.२१च्या सरासरीने ४४३२ धावा केल्या आहेत. आयपीएलच्या तेराव्या हंगामात तो अजून १० सामने खेळत त्याचे आयपीएलमधील २०० सामने पूर्ण करु शकतो. तर, चावलाने आतापर्यंत १५७ सामने खेळत १५० विकेट्स चटकावल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पुन्हा खळबळ! चेन्नई पाठोपाठ आता या आयपीएल संघाच्या सदस्याला कोरोनाची बाधा
फलंदाजाच्या कानाजवळून ‘झूप’ असा आवाज करत गोलंदाजी करणारे ३ आयपीएल स्टार
जोस बटलरच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने असे केले ऑस्ट्रेलियाला पराभूत
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० धावांचा टप्पा ओलांडणारे ५ क्रिकेटर्स; या भारतीयांचा आहे समावेश
आरसीबीला पहिल्यांदा आयपीएल विजेता बनवण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात हे ३ परदेशी खेळाडू
आयपीएलमध्ये पर्पल कॅपचे मानकरी ठरलेले ४ भारतीय गोलंदाज