आयसीसी टी20 विश्वचषकाची मुहूर्तमेढ 2007 साली रोवण्यात आली होती. पहिल्या वहिल्या टी20 विश्वचषकाचे विजेतेपद जिंकण्याचा मान एमएस धोनी याच्या नेतृत्वातील युवा भारतीय संघाने पटकावला होता. यानंतर धोनी पुढील प्रत्येक टी20 विश्वचषकातही भारतीय संघाचा भाग होता. मात्र, त्यावेळी विजेतेपद जिंकता आले नव्हते. आता आयसीसी टी20 विश्वचषक 2022मध्ये धोनी भारतीय संघाचा भाग नाहीये. अशा परिस्थितीत चाहते त्याची खूपच आठवण काढत आहेत. नुकताच धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो टी20 विश्वचषकाबद्दल बोलताना दिसला.
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकून आता 2 वर्षे उलटली आहेत. मात्र, त्याच्या चाहत्यांमध्ये तिळमात्र कमतरता झाली नाहीये. त्याचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. धोनीने नुकतेच एका कार्यक्रमात सहभाग नोंदवला. यावेळी एँकरने क्रिकेटबद्दल चर्चा करण्यास सुरुवात केली, तेव्हाच धोनीने त्याला मध्येच रोखले आणि असे काही म्हटले, ज्याने चाहतेही लोटपोट झाले.
खरं तर, जेव्हाही क्रिकेट आणि टी20 विश्वचषकाचा उल्लेख झाला, तेव्हा धोनी म्हणाला की, “मी विश्वचषक खेळत नाहीये. संघ आधीच रवाना झाला आहे.” धोनीचे हे वाक्य ऐकताच प्रत्येकजण हसू लागला. यादरम्यानचा व्हिडिओ भन्नाट व्हायरल होत आहे.
https://twitter.com/thebrainofmsd/status/1582911511760015361?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1582911511760015361%7Ctwgr%5E993961f532321e92bb176268a43ce590d3afa5f4%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.timesnowhindi.com%2Fsports%2Fcricket%2Fms-dhoni-leaves-fans-in-laughter-when-he-said-i-am-not-playing-the-world-cup-flight-has-already-left-article-95014710
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, पण तो अजूनही एक सक्रिय क्रिकेटपटू आहे. तो आयपीएलमध्ये खेळतो आणि आगामी हंगामातही तो चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. धोनीचा आयपीएल 2023हा शेवटचा हंगाम असू शकतो. यामागील कारण म्हणजे, त्याने म्हटले होते की, चेन्नईच्या मैदानावर चाहत्यांच्या उपस्थितीत त्याने निवृत्ती घ्यावी. यावेळी कोरोना नसल्यामुळे स्पर्धेचे आयोजन चेन्नईमध्येही होईल. अशात हे पाहणे रंजक ठरेल की, धोनी त्याच्या भविष्याबद्दल काय निर्णय घेतो.
टी20 विश्वचषक 2022बद्दल बोलायचं झालं, तर भारतीय संघाचा स्पर्धेतील पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी धोनीचे हे वक्तव्य जोरदार चर्चेत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग: महिला क्रिकेट संघाच्या बसचा अपघात; चार खेळाडू आणि मॅनेजर गंभीर जखमी
ताहिरचे पाकिस्तानसाठी कोणते स्वप्न राहिले अपूर्ण? 43 वर्षांच्या वयात सांगितल्या मनातील भावना