क्रीडाविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी नेपाळ संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये आपला जलवा दाखवणारा संदीप लामिछाने याच्याबद्दल आहे. संदीपला गुरुवारी (दि. 6 ऑक्टोबर) नेपाळच्या काठमांडू विमानतळावर अटक करण्यात आली आहे. त्याला नेपाळ पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्या’चार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. विशेष म्हणजे, संदीपने तो आत्मसमर्पण करणार असल्याचे त्याच्या सोशल मीडियावरून सांगितले होते. या बातमीने क्रीडाविश्वात एकच खळबळ माजली आहे.
संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याने त्याच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केला होता की, तो निर्दोष आहे. त्याने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. संदीपने त्याच्या लेटेस्ट फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते की, तो निर्दोष आहे. तसेच, तो प्रत्येक चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य करेल. त्याने या संपूर्ण प्रकरणाच्या तपासादरम्यान आपल्या वकिलांना सोबत ठेवण्याची विनंती केली होती.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्या’चार केल्याप्रकरणी नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने याला स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता काठमांडू विमानतळावरून अटक करण्यात आली. संदीपने यापूर्वी फेसबुकवरून आपली बाजू मांडली होती. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “मी चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करेल आणि स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कायदेशीर लढाई लढेल.”
https://twitter.com/ANI/status/1577893282818007041
दुसरीकडे, आणखी एका वृत्तानुसार, संदीपला रविवारी (दि. 9 ऑक्टोबर) न्यायालयात हजर केले जाऊ शकते. नेपाळ पोलीस याची तयारी करत आहेत. काठमांडू जिल्हा न्यायालयाने मागील 23 ऑगस्ट रोजी संदीपची चौकशी करण्यासाठी त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. मात्र, त्यापूर्वीच तो त्याच्या वेळापत्रकानुसार क्रिकेटसाठी देशाबाहेर गेला होता.
https://twitter.com/aayushsubedi32/status/1577896847003488256
संदीपच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 9 आयपीएल सामने खेळले आहेत. 22 वर्षीय संदीपने या सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना 13 विकेट्स घेतल्या होत्या. यादरम्यान 36 धावा देत 3 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ भारतीय खेळाडूसाठी लकी ठरतयं 2022! टी20 पाठोपाठ वनडेत पदार्पण, वर्ल्डकपच्याही संघात
अखेर प्रतिक्षा संपली! तब्बल 15 महिन्यांनी झाले ऋतुराजचे वनडे पदार्पण





