भारतीय संघाचे माजी अष्टपैलू आणि बीसीसीआयचे माजी मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा हे मागील काही दिवसांपूर्वी चांगलेच चर्चेत होते. चेतन शर्मा यांचे स्टिंग ऑपरेशन समोर आल्यानंतर त्यांना मुख्य निवडकर्ते पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आतापर्यंत बीसीसीआयने मुख्य निवडकर्ता घोषणा केली नाहीये. मात्र, अशातच राजीनामा देणारे चेतन शर्मा निवडकर्ते म्हणून परतले आहेत.
चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी 28 जून पासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफी (Duleep Trophy) स्पर्धेसाठी त्यांनी निवडकर्ते (Selector Chetan Sharma) म्हणून पुनरागमन केले आहे. तसेच, त्यांनी नॉर्थ झोन संघाची निवडही केली. बीसीसीआयचे माजी कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चेतन शर्मा यांनी हरियाणाचे प्रतिनिधित्व केले आणि नॉर्थ झोन संघ निवडला.
या बैठकीचे आयोजन गुरुवारी (दि. 15 जून) गुरुग्राम क्रिकेट मैदानावर झाले. यामध्ये चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील पॅनेलने नॉर्थ झोनच्या 15 सदस्यीय संघाची निवड केली. याव्यतिरिक्त या संघात 8 राखीव खेळाडूही निवडले. तसेच, पॅनेलने प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांचीही नावे सांगितली. दुलीप ट्रॉफीचे आयोजन 28 जून ते 16 जुलैदरम्यान बंगळुरूत होईल. यासाठी पॅनेलने नॉर्थ झोनसाठी अशा खेळाडूची कर्णधार म्हणून निवड केली, ज्याचे प्रदर्शन मागील काही काळापासून आणि आयपीएल 2023मध्ये खूपच खराब राहिले होते.
आयपीएलमधील फ्लॉप खेळाडू नॉर्थ झोनचा कर्णधार
नॉर्थ झोनच्या संघाविषयी बोलायचं झालं, तर आयपीएलमधील एक फ्लॉप खेळाडूकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. तो खेळाडू म्हणजेच पंजाबचा मनदीप सिंग (Mandeep Singh) होय. मनदीपने आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून फक्त 3 सामने खेळले. यामध्ये त्याला फक्त 14 धावाच करता आल्या. यामध्ये तो एकदा शून्यावरही बाद झाला होता. याव्यतिरिक्त 2022मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतानाही तो 3 सामने खेळला होता आणि फक्त 18 धावा केल्या होत्या. त्याने आयपीएलच्या 2012 हंगामात पंजाब किंग्सकडून 16 सामने खेळताना 27च्या सरासरीने 432 धावा केल्या होत्या. त्यानंतर तो 300 धावांचाही आकडा पार करू शकला नाहीये. आता त्याला नॉर्थ झोनची जबाबदारी मिळाली आहे. अशात तो संघासाठी कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
नॉर्थ झोनचा संपूर्ण संघ
15 सदस्यीय संघ-
मनदीप सिंग (कर्णधार), प्रशांत चोप्रा, ध्रुव शोरे, अंकित कलसी, प्रभसिमरन सिंग, अंकित कुमार, पुलकित नारंग, निशांत सिंधू, मनन वोहरा, जयंत यादव, बलतेज सिंग, वैभव अरोरा, हर्षित राणा, सिद्धार्थ कौल, आबिद मुश्ताक
राखीव खेळाडू-
मयंक डागर, मयंक मार्कंडे, रवी चौहान, अनमोल मल्होत्रा, नेहाल वढेरा, दिवेश पठानिया, दिविज मेहरा, कुणाल महाजन
महत्वाच्या बातम्या-
Ashes मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे पाच गोलंदाज, यादीतील दोघांनी घेतलाय जगाचा निरोप
‘तुझ्यामुळे भारत विश्वचषक जिंकत नाहीये’, ट्रोलरने आकाश चोप्राला केले ट्रोल, म्हणाला, ‘मी घेतो जबाबदारी’