भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा आता आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. चार वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, सध्या तो केवळ आयपीएल खेळताना दिसतो. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने आयसीसीच्या सर्व स्पर्धा आपल्या नावे केल्या होत्या. धोनीला प्रथम भारतीय संघाचे कर्णधार म्हणून नियुक्त करणारे निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी आता धोनीला कोणत्या कारणाने भारतीय संघाचा कर्णधार बनवले याबाबत खुलासा केला.
नेतृत्वाचा कोणताही अनुभव नसताना धोनीला 2007 टी20 विश्वचषकात भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले होते. या विश्वचषकातून सर्व वरिष्ठ खेळाडूंनी माघार घेतल्यानंतर धोनीकडे जबाबदारी आलेली. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत हा विश्वचषक उंचावला. त्यावेळी घडलेल्या घडामोडींविषयी बोलताना वेंगसरकर म्हणाले,
“धोनीकडे पाहून आम्हाला दरवेळी त्याच्यातील नेतृत्वगुण दिसायचे. मैदानावरील त्याचा वावर कसा आहे, तो संघातील इतर खेळाडूंची कसा बोलतो, पुढे होऊन जबाबदारी घेण्याची त्याची क्षमता, सर्वजणांना सोबत घेऊन जाण्याची त्याची कुवत व खेळाची समज या सर्व गोष्टी त्याच्या बाजूने होत्या. विश्वचषकाच्या आधी सचिन तेंडुलकरने आम्हाला ज्यावेळी कर्णधार म्हणून धोनीचे नाव सुचवले तेव्हा, कोणालाच त्याच्या नावाला विरोध करता आला नाही.”
धोनीने जवळपास दहा वर्षे भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2007 टी20 विश्वचषक, 2011 वनडे विश्वचषक व 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावे केलेली. त्या व्यतिरिक्त भारतीय संघाला प्रथमच कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी नेण्याची कामगिरी देखील त्याच्याच नेतृत्वात झालेली. त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने पाच वेळा आयपीएल तसेच दोन वेळा चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकली आहे.
(Former Chief Selector Dilip Vengsarkar Speaks On Dhoni Selection As Team India Captain In 2007)
महत्वाच्या बातम्या –
MPL 2023मध्ये रत्नागिरी जेट्सचा दुसरा विजयी, सीएसके ‘इतक्या’ धावांनी पराभूत
ऑस्ट्रेलियाने फोडला इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’चा फुगा! ऍजबस्टन कसोटीत मिळवला थरारक विजय