---Advertisement---

“जेव्हा विराट दर हंगामात करतो, तेव्हा…” RCBच्या फलंदाजीवर माजी क्रिकेटपटूची मोठी प्रतिक्रिया

On: शुक्रवार, एप्रिल 25, 2025 3:21 PM
---Advertisement---

यंदाच्या आयपीएल हंगामात (IPL 2025) मध्ये विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट जोरात बोलत आहे. कोहली जवळजवळ प्रत्येक सामन्यात धावा काढत आहे. जर आपण काही सामने सोडले तर विराट कोहलीने चमकदार कामगिरी केली आहे. कोहली एका टोकाला राहतो आणि बाकीचे फलंदाज आक्रमक फटके खेळतात. दरम्यान माजी क्रिकेटपटू आरोन फिंचने (Aaron Finch) आरसीबीच्या या रणनीतीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

चिन्नास्वामी येथे राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळलेल्या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) जबरदस्त खेळी केली. त्याने फक्त
42 चेंडूत 70 धावा केल्या आणि संघाचा धावसंख्या 200च्या पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याच्याशिवाय देवदत्त पडिक्कलनेही शानदार अर्धशतक झळकावले.

आरसीबीच्या संघाची ही रणनीती पाहून ईएसपीएन क्रिकइन्फोवर एका संभाषणादरम्यान आरोन फिंच म्हणाला, ” जर तुम्ही 650, 700 धावा केल्या, जरी तुमचा स्ट्राईक रेट 150 किंवा 200 असला तरी, तुमच्या संपूर्ण संघाला तुमच्याभोवती खेळण्याची संधी मिळते. यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांना उच्च जोखीम असलेले शॉट्स खेळण्याची संधी मिळते. लियाम लिव्हिंगस्टोन सारख्या फलंदाजांनी हे केले आहे. गेल्या वर्षी ग्लेन मॅक्सवेल असेच करण्याचा प्रयत्न करत होता आणि यावेळी रजत पाटीदारही तेच करत आहे.”

यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबी संघ सातत्याने शानदार कामगिरी करत आहे. गुरूवारी (24 एप्रिल) खेळल्या गेलेल्या सामन्यात संघाने राजस्थान रॉयल्सचाही पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना, निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 205 धावांची मोठी धावसंख्या उभारली. विराट कोहलीने 42 चेंडूंत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 70 धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघ 9 गडी गमावून फक्त 194 धावा करू शकला. संघासाठी यशस्वी जयस्वालने फक्त 19 चेंडूत 49 धावा केल्या पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. दरम्यान या विजयासहित आरसीबीने यंदाच्या हंगामात घरच्या मैदानावर पहिलाच विजय मिळवला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---