दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज माजी कर्णधार एबी डिविलियर्स गुरुवारी (दि. 03 नोव्हेंबर) भारताच्या बंगळुरू शहरात पोहोचला. डिविलियर्स इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळायचा. मात्र, त्याने 2022 आयपीएलनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे तो आयपीएल 2023मध्येही बेंगलोर संघाचा भाग नसेल. अशात तो भारतात आल्याने चाहत्यांना प्रश्न पडला आहे. याचे कारण स्वत: डिविलियर्सने सांगितले आहे.
खरं तर, एबी डिविलियर्स (AB De Villiers) आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी भारतात आला आहे. तसेच, तो आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामासाठीच्या तयारीलाही लागला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे. त्यांनी व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “लेडिज अँड जंटलमन, सुपरह्युमन आला आहे. तसेच, त्याने येण्यामागील कारणही सांगितले आहे. आपल्या घरी स्वागत आहे एबी डिविलियर्स.”
https://twitter.com/RCBTweets/status/1588079074068815872
या व्हिडिओत भारतात येण्यामागील कारण सांगताना एबी डिविलियर्स याने म्हटले की, “मी इथे आगामी आयपीएलमध्ये आपल्या आरसीबीच्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. बंगळुरूत परत आल्याने चांगले वाटत आहे. तसेच, आजचा दिवस खूपच चांगला आहे.”
https://twitter.com/RCBTweets/status/1588099712649158657
एबी डिविलियर्सनेही ट्वीट करत याची माहिती दिली आहे. तो म्हणाला की, “अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदा आयटीसी रॉयल गार्डेनियामध्ये नुकतेच चेक इन केले. खूप चांगल्या आठवणी पुन्हा येत आहेत. सोबतच मला हेदेखील सांगितले गेले आहे की, मी 25व्यांदा या हॉटेलमध्ये चेक इन करत आहे. याव्यतिरिक्त मी पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यासाठीही तयार आहे. बंगळुरूत पुन्हा येऊन खूप चांगले वाटत आहे.”
https://twitter.com/ABdeVilliers17/status/1588063936959905792
एबी डिविलियर्स हा दक्षिण आफ्रिकेचा शानदार कर्णधार होता. त्याचा भारतातही मोठा चाहतावर्ग आहे. तो आयपीएलमध्ये बेंगलोर संघाकडून खेळत असताना त्याने खूप मोठा चाहतावर्ग कमावला. अशात तो आगामी आयपीएलमध्ये संघाचा भाग नसेल, परंतु तो संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये त्याला सामील केले जाऊ शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताकडून टी20 विश्वचषकात विराटच करतोय सर्वाधिक धावा; गंभीर, रैना अन् रोहितही मागेच
व्हिडिओ: संजू सॅमसनने केला टेनिस बॉलचा सराव, एकापेक्षा एक शॉट मारताना दिसला पठ्ठ्या