---Advertisement---

अजित आगरकरची वरिष्ठ पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड, बीसीसीआयने दिली माहिती

On: मंगळवार, जुलै 4, 2023 9:43 PM
Ajit-Agarkar
---Advertisement---

भारतीय क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू अजित आगरकर याची वरिष्ठ पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पगारातही वाढ करण्यात आल्याचे बोलले जात आहे. ही माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने सोशल मीडियावरून दिली आहे.

माजी क्रिकेटपटू अजित आगरकर (Ajit Agarkar) याचे निवड समितीचा अध्यक्ष बनणे जवळपास निश्चित होते. मागील वेळी जेव्हा चेतन शर्मा (Chetan Sharma) यांना पुन्हा मुख्य निवडकर्ता बनवण्यात आले होते, तेव्हाही अजित आगरकर या शर्यतीत सामील होते. मात्र, त्यावेळी चेतन शर्मा यांनी बाजी मारली होती. मात्र, चेतन शर्मांचे एक स्टिंग ऑपरेशन सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते. ज्यामुळे त्यांना आपले मुख्य निवडकर्त्याचे पद सोडावे लागले होते. मागील काही महिन्यांपासून मुख्य निवडकर्त्याचे पद रिकामे होते. अशात आता अजित आगरकर मुख्य निवडकर्ता (Ajit Agarkar Chief Selector) पदावर विराजमान झाला आहे.

आगरकर यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाशी जोडला गेला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच आगरकरने दिल्लीची साथ सोडली होती. याची माहितीही दिल्ली कॅपिटल्स संघाने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली होती. यानंतर म्हटले जात होते की, आगरकर मुख्य निवडकर्ता बनवले जाईल. पुढील महिन्यात खेळल्या जाणाऱ्या आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेपूर्वी आगरकर याची निवड महत्त्वाची मानली जात आहे. यासोबतच वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेबाबतही अजित आगरकर याची भूमिका महत्त्वाची ठरेल.

अजित आगरकर (Ajit Agarkar) याने मागील महिन्यात 29 जून रोजी शेवटच्या तारखेच्या एक दिवस आधीच अर्ज केला होता. आता 45 वर्षीय आगरकर निवड समितीच्या अध्यक्षपदावर विराजमान झाला आहे. त्याने भारताकडून 26 कसोटी सामने आणि 191 वनडे सामने खेळले आहेत. त्याची निवड झाल्यामुळे समितीत वेस्ट झोनमधून दोन निवडकर्त्यांचा समावेश झाला. यामध्ये सलील अंकोला हा या झोनमधील दुसरा निवडकर्ता आहे. इतर तीन निवडकर्त्यांमध्ये शिव सुंदर दास, एस शरथ आणि शुब्रतो बॅनर्जी यांचा समावेश आहे. (Former Cricketer Ajit Agarkar has been appointed as the Chairman of the senior men’s selection committee)

महत्वाच्या बातम्या-
कोणाला मिळणार वर्ल्डकपचे लास्ट तिकीट? झिम्बाब्वेच्या पराभवानंतर असे बनले समीकरण, वाचा सविस्तर
उद्ध्वस्त होत असलेल्या विंडीजला वाचवण्यासाठी धावून आला ब्रायन लारा, भारताविरुद्धच्या मालिकेत मोठी जबाबदारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---