---Advertisement---

Big News: भारतीय महिला संघाला मिळाला मुख्य प्रशिक्षक, देशांतर्गत क्रिकेटमध्ये पाडलाय 33 शतकांचा पाऊस

On: गुरूवार, ऑक्टोबर 26, 2023 10:08 AM
Amol-Muzumdar-And-Wasim-Jaffer
---Advertisement---

भारतीय क्रिकेटमधून आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबईचा माजी कर्णधार आणि देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू अमोल मुझुमदार भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. बुधवारी (दि. 25 ऑक्टोबर) मुझुमदारच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य सुलक्षणा नाई, अशोक मल्होत्रा आणि जतीन परांजपे यांनी अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यातून मुझुमदारची निवड होणे नक्की मानले जात होते, पण याच्या घोषणेसाठी बराच वेळ लागला.

मोठी जबाबदारी
बीसीसीआयने सांगितले की, “बऱ्याच काळ चाललेल्या चर्चेनंतर तीन सदस्यीय समितीने सर्वांच्या संमतीने अमोल मुझुमदार याची निवड केली.” मागील वर्षी डिसेंबरमध्ये रमेश पोवार यांना भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून काढल्यानंतर हे पद रिक्त होते. त्यामुळे ऋषिकेश कानिटकर हे अस्थायीरीत्या ही जबाबदारी पार पाडत होते.

मुझुमदारचे विधान?
भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार (Amol Muzumdar) याने या पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, “भारतीय महिला क्रिकेट संघाचा प्रशिक्षक बनवल्यामुळे मला अभिमान वाटत आहे. मी सीएसी आणि बीसीसीआयला माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद देतो. ही एक मोठी जबाबदारी आहे. या प्रतिभावान खेळाडूंना चांगल्या प्रदर्शनासाठी तयारी करण्यात मी त्यांची मदत करेल.” मुझुमदार याच्याकडे मुख्य प्रशिक्षकपद आल्यामुळे आता कानिटकर एनसीएमध्ये परतून पुरुष अ संघ किंवा 19 वर्षांखालील संघासोबत जोडले जाऊ शकतात.

मुझुमदारची कामगिरी
देशांतर्गत क्रिकेटमधील अमोल मुझुमदार याचे आकडे भुवया उंचावणारे आहेत. त्याने 171 प्रथम श्रेणी सामने खेळताना 48.13च्या सरासरीने 11167 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याच्या नावावर 30 शतकांचीही नोंद आहे. याव्यतिरिक्त त्याने 100 अ दर्जाच्या सामन्यात 38.20च्या सरासरीने 3286 धावा केल्या आहेत. यात 3 शतकांचा समावेश आहे. तसेच, त्याने 14 टी20 सामनेही खेळले आहेत. (former cricketer amol muzumdar became head coach of indian womens cricket team)

हेही वाचा-
पंड्याच्या दुखापतीविषयी धक्कादायक बातमी! एक-दोन नाही, तर ‘एवढ्या’ सामन्यांना मुकण्याची शक्यता
शतकांचा वर्ल्डकप! पहिल्या 24 सामन्यातच ठोकली गेली ‘रेकॉर्डब्रेक’ शतके

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---