भारतीय संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने सोमवारी (दि. 03 जुलै) आपला 43वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी चाहते आणि दिग्गज क्रिकेटपटूंनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षावही केला. मात्र, वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी हरभजन सिंग ट्रोल होण्यापासून वाचू शकला नाही. चाहत्यांनी त्याला वाईटरीत्या ट्रोल केले. यावेळी चाहत्यांनी त्याला इंग्रजीचे धडे दिले. अनेकांनी त्याला वेगवेगळ्या कमेंट्स करून प्रतिक्रिया दिल्या. चला तर, सविस्तर जाणून घेऊयात…
नेमकं काय घडलं?
झालं असं की, ट्विटरवर एका क्रिकेट वेबसाईटने विचारले की, सध्याच्या काळातील 5 सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर देताना हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने 5 खेळाडूंची नावे घेतली. हरभजनने नेथन लायन, स्टीव्ह स्मिथ, रिषभ पंत, रवींद्र जडेजा आणि बेन स्टोक्स यांच्या नावाचा उल्लेख केला. इथपर्यंत सर्व ठीक होते, पण त्याने लायनव्यतिरिक्त इतर सर्व खेळाडूंच्या नावाची स्पेलिंग चुकीच्या लिहिल्या होत्या. हेच चाहत्यांना आवडले नाही, आणि त्यांनी त्याला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली.
एका युजरने लिहिले की, “इंग्रजी शिकण्याची हीच वेळ आहे.” याव्यतिरिक्त त्याने हरभजनला 5 पैकी एक गुण देऊन नापास ठरवले.
It’s time to learn English mate pic.twitter.com/ipTKexbDmm
— ????????????????????????????????????????????????????™ (@Itzshreyas07) July 4, 2023
दुसऱ्या एकाने लिहिले की, “पाजी पेग घेऊन ट्वीट करत नका जाऊ.”
Paaji peg laake tweet na karya karo. ????
— Abhishek Mudgal (@AbhishekMudgal_) July 4, 2023
आणखी एकाने लिहिले की, “भावा एकाची तर माफ आहे, पण इथे तर प्रत्येकाच्या स्पेलिंगमध्ये चूक थोडीच असते.”
Bhaii, ek typo tho maaf hain.. lekin yeh har kisi ki spelling me galthi thodee hothee hain…
— Ramkrishna Iyer (@KannanK51531500) July 4, 2023
याव्यतिरिक्त इतर युजर्सनीही फोटो कमेंट करत चूक दाखवली आहे.
— Baby Bruno (@Shiv_rants) July 4, 2023
हरभजन सिंग याची कारकीर्द
हरभजन सिंग याच्याविषयी बोलायचं झालं, तर त्याची गणना भारताच्या शानदार खेळाडूंमध्ये होते. त्याच्या कारकीर्दीबद्दल जाणून घ्यायचं झालं, तर त्याने त्याच्या कारकीर्दीत एकूण 700हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. हरभजनने कसोटीत 417, वनडेत 269 आणि टी20त 25 विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला आहे. कसोटीत हरभजनने फलंदाजी करताना 2 शतकेही झळकावली आहेत. (former cricketer harbhajan singh trolled for type wrong spelling on twitter know here)
महत्वाच्या बातम्या-
हरमनवर वनडे रँकिंगमध्ये, तर मितालीवर ‘या’ विक्रमात श्रीलंकेची कॅप्टन भारी; 60 चेंडूमुळे रेकॉर्ड उद्ध्वस्त
तोंडात निप्पल, खाली डायपर; स्टोक्सला बाळाच्या रूपात दाखवल्याने पेटला वाद, कर्णधाराने दिले सडेतोड प्रत्युत्तर