सध्या भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेसाठी भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) देखील समावेश करण्यात आला होता. शमी एका वर्षानंतर भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामना खेळेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती, मात्र भारत-इंग्लंड पहिल्या टी20 सामन्यासाठी संघात शमीची निवड झाली नाही. दरम्यान आता माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने (Irfan Pathan) शमीच्या पुनरागमनाबाबत विधान केले आहे.
इरफान पठाण (Irfan Pathan) म्हणाला की, “जर तुमच्याकडे इतका दीर्घ अनुभव असेल, तुम्ही भारताच्या टॉप-10 गोलंदाजांमध्ये असाल, तर तुम्हाला नक्कीच माहित असेल की तुमचे शरीर काय करण्यास सक्षम आहे. मोहम्मद शमी नेहमीच संघ व्यवस्थापनाला प्रामाणिक प्रतिक्रिया देतो. यानंतर, परस्पर समजुतीने निर्णय घेतले जातात. विशेषतः जेव्हा तुम्ही नियमितपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असता. मला विश्वास आहे की भारतीय संघ व्यवस्थापन योग्य वेळी योग्य निर्णय घेईल.”
पुढे बोलताना इरफान पठाण म्हणाला की, “मोहम्मद सिराज या भारतीय संघात असायला हवा होता. जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह असल्याने, मोहम्मद सिराज हा एक चांगला बॅकअप ठरला असता.”
मोहम्मद शमीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 64 कसोटी, 101 वनडे आणि 23 टी20 सामने खेळले आहेत. 64 कसोटीत त्याने 229 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. दरम्यान त्याची सरासरी 27.71 आहे. 101 वनडे सामन्यात त्याने 23.68च्या सरासरीने 195 विकेट्स घेतल्या आहेत. तर 23 टी20 सामन्यात त्याने 24 विकेट्स घेतल्या आहेत. टी20 मधील त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 15 धावात 3 विकेट अशी आहे.
अधिक वाचा-
Champions Trophy; भारताच्या सामन्यांचा पाकिस्तानला होणार बंपर फायदा
आयपीएल 2025पूर्वी केकेआरचे वाढले टेन्शन, सर्वात महागड्या खेळाडूला झाली दुखापत!
रवींद्र जडेजाचा रणजी स्पर्धेत धुमाकूळ, पंजा उघडत रिषभ पंतच्या संघाचं कंबरडा मोडला