भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांनी सुपरस्टार सलमान खान याच्यावर आगपाखड केली आहे. लक्ष्मण यांनी सलमानच्या नवीन गाण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्याने दक्षिण भारतीय संस्कृतीचा अपमान केला आहे. ईदच्या निमित्ताने सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमातील गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. या गाण्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. या गाण्याचं नाव ‘येंतामा’ असे आहे. मात्र, या गाण्यात ते दक्षिण भारतीय पारंपारिक ड्रेस धोतर परिधान करून डान्स करत आहेत.
माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामाकृष्णन (Laxman Sivaramakrishnan) यांना सलमान खान (Salman Khan) याच्या गाण्यातील लिरिक्सची समस्या आहे. त्यांनी एक ट्वीट शेअर करत लिहिले की, “या गाण्यात दक्षिण भारतीय संस्कृतीचा अपमान केला आहे. गाण्यात अभिनेते जी गोष्ट पकडून नाचत आहेत, ती लुंगी नाही, धोतर आहे. ते एक क्लासिक आऊटफिट आहे. या गाण्यात धोतर चुकीच्या पद्धतीने दाखवले जात आहे.”
https://twitter.com/LaxmanSivarama1/status/1644617182016602112?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1644617182016602112%7Ctwgr%5E070a04003acea1d6b0958625ac9ee9e7e5b119fb%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Fcricket-news%2Flaxman-sivaramakrishnan-slams-salman-khan-out-fit-in-yentamma-song%2Farticleshow%2F99341687.cms
विशेष म्हणजे, त्यांनी इतर ट्वीट करत लुंगी आणि धोतरचे फोटो शेअर करून फरकही समजून सांगितला.
https://twitter.com/LaxmanSivarama1/status/1644648719109836800
https://twitter.com/LaxmanSivarama1/status/1644648368784785408
खरं तर, सलमान खानच्या या गाण्यात दाक्षिणात्य इंडस्ट्रीचा सुपरस्टार रामचरण देखील दिसत आहे. या गाण्याला विशाल दादलानी आणि पायल देव यांनी आवाज दिला आहे. गाण्याचे लिरिक्स शब्बीर अहमद यांनी लिहिले आहेत. तसेच, गाण्याला पायल देवने संगीत दिले आहे. अशात लक्ष्मण यांनी नाराजी व्यक्त केली असली, तरीही सलमान किंवा चित्रपट निर्मात्यांकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आली नाहीये.
लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांचे आंतरराष्ट्रीय पदार्पण
भारतासाठी 9 कसोटी आणि 16 वनडे सामने खेळणाऱ्या लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांनी 17 वर्षांच्या वयात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. मात्र, त्यांना आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत खास कामगिरी करता आली नाही. कसोटीत त्यांनी भारताकडून 26 विकेट्स घेतल्या. तसेच, वनडेत 15 विकेट्स नावावर केल्या. दुसरीकडे, निवृत्ती घेतल्यानंतर लक्ष्मण यांनी त्यांच्या आयुष्यातील दुसऱ्या डावाची सुरुवात समालोचनाच्या रूपात केली होती. इंग्रजीत समालोचन करून त्यांनी चांगले नाव कमावले. अनेकदा ते वेगवेगळ्या ब्रॉडकास्टरसोबत विशेषज्ञ म्हणूनही झळकले आहेत. (former cricketer laxman sivaramakrishnan slams salman khan out fit in yentamma song)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बोल्टचा नादच नाही! 2019 पासून बनलाय आयपीएलचा नंबर वन गोलंदाज, वाचा सविस्तर
आयपीएलचा जादू बनतोय बटलर! दिवसाच्या सामन्यांमध्ये उभारतोय धावांचा डोंगर, पाहा जबरदस्त आकडेवारी