बलाढ्य संघांमध्ये गणल्या जाणाऱ्या भारतीय संघाची बांगलादेशपुढे दाणादाण उडाली. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत बांगलादेशने भारतावर 2-0ने आघाडी घेतली आहे. यानंतर भारतीय संघावर टीकेची झोड उडाली. चाहत्यांपासून ते दिग्गज क्रिकेटपटूंपर्यंत सर्वजण भारतावर टीका करत आहेत. अशात भारतीय संघाला 1983चा विश्वचषक जिंकून देणाऱ्या मदन लाल यांनी तीन भारतीय दिग्गज फलंदाजांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले आहेत की, त्यांनी मागच्या तीन वर्षात किती शतके ठोकली आहेत?
‘भारतीय संघाचे वरिष्ठ खेळाडू चांगली कामगिरी करत नाहीत’
रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यासारखे दिग्गज फलंदाज वनडेत सातत्याने फ्लॉप होत आहेत. तसेच, सामना जिंकण्यातही अपयशी ठरत आहेत. या तिघांवरही मदन लाल (Madan Lal) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “जर तुम्ही रेकॉर्ड पाहिला, तर या वरिष्ठ खेळाडूंनी मागील तीन वर्षात किती शतके केली आहेत. मागील एका वर्षात यांच्या बॅटमधून किती शतके निघाली आहेत. जसजसे तुमचे वय वाढत जाते, तसतशी तुमची गती मंदावते. मात्र, हे खेळाडू खूप अनुभवी आहेत आणि त्यांनी कामगिरी केली पाहिजे होती. मात्र, तुमची वरची फळीच कामगिरी करणार नसेल, तर तुम्हाला सामने जिंकता येणार नाहीत.”
भारतीय संघाची वनडे विश्वचषकाची तयारी चांगली होत असल्याचे दिसत नाहीये. वनडे विश्वचषक पुढील वर्षी भारतातच होणार आहे. अशात आता खूपच कमी वेळ राहिला आहे. सर्व संघांनी त्यांची तयारी सुरू केली आहे. मात्र, भारतीय संघाची तयारी तितकी चांगली असल्याचे दिसत नाहीये. भारतीय संघाला वनडे मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. सर्वप्रथम संघाला न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आता बांगलादेशविरुद्धही भारताने दोन सामने गमावत मालिकेवर पाणी सोडले आहे. (former cricketer madan lal slams rohit kohli rahul after bangladesh loss)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला नडणाऱ्या पठ्ठ्याने सोडली इंग्लंडची साथ; ‘या’ देशासाठी खेळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट
BANvIND: नाणेफेक जिंकून बांगलादेशचा गोलंदाजीचा निर्णय; भारतीय संघात दोन महत्त्वपूर्ण बदल