Virat or Gambhir Who Is More Aggressive: भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे मैदानात आणि मैदानाबाहेर त्यांच्या आक्रमकतेसाठी ओळखले जातात. त्या खेळाडूंमध्ये भारतीय दिग्गज विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या नावाचाही समावेश होतो. मात्र, यांच्यापैकी सर्वात आक्रमक कोण, असा प्रश्न विचारला, तर चाहते वेगवेगळी उत्तरे देतील. परंतु भारतीय संघाचा माजी खेळाडू पार्थिव पटेल याने दिल्लीच्या या दोन खेळाडूंमधील सर्वात मोठे अंतर सांगत आपले मत मांडले आहे.
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि माजी कर्णधार तसेच दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हे दोघेही दिल्लीचे आहेत. ते मैदानातील त्यांच्या त्यांच्या आक्रमकतेसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त विराट आणि गंभीर यावर्षी आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामादरम्यान आपल्या वादामुळेही चर्चेत होते.
पार्थिव काय म्हणाला?
अशातच पार्थिव पटेल (Parthiv Patel) याने विराट कोहली आणि गौतम गंभीर (Virat Kohli And Gautam Gambhir) या दोघांविषयी बोलताना मोठे विधान केले. तो म्हणाला की, दोघेही विनम्र खेळाडू आहेत, पण रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा माजी कर्णधार विराट कोहली जास्त आक्रमक (Virat Kohli is More Aggressive) आहे. पटेलने विराटचे जोरदार कौतुकही केले.
एनआयच्या वृत्तानुसार, पार्थिव पटेलने एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना म्हटले की, “विराट कोहली मैदानावर आणि मैदानाबाहेर खूपच विनम्र आहे. गौतमही खूप विनम्र आहे. माझा म्हणण्याचा अर्थ असा की, जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता, तेव्हा तुम्हाला तुमच्या देशासाठी सामना जिंकायचा आहे, तर निश्चितच तुमच्यात आक्रमकता येते.
‘विराट कोहली जरा जास्त आक्रमक’
पुढे बोलताना पार्थिव म्हणाला की, “मात्र, आपण सर्वजण विराट कोहलीवर प्रेम करतो, त्याला पसंत करतो. ज्याप्रकारे तो जल्लोष करतो आणि गोष्टी करतो, सर्वजण त्याचे दीवाने आहेत. तो अनेकांना प्रेरित करतो. मी गौतमसोबतही खूप क्रिकेट खेळलो आहे, पण मी म्हणेल की, विराट जरा जास्त आक्रमक आहे.”
पार्थिवने म्हटले की, तो सौरव गांगुली, एमएस धोनी आणि विराट कोहली या तिघांच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. मात्र, त्याच्या मनात त्याच्या पहिल्या कर्णधारासाठी नेहमीच सॉफ्ट कॉर्नर राहील. पार्थिवने माजी भारतीय कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली याला सर्वोत्तम कर्णधार म्हणून निवडले. (former cricketer parthiv patel makes bold remark on difference between virat kohli and gautam gambhir)
हेही वाचा-
IPL 2024 लिलावात इतिहास घडवण्यासाठी सज्ज असलेली Mallika Sagar आहे तरी कोण? जाणून घ्या सर्वकाही
IPL 2024 Auction पूर्वी BCCIचा मोठा निर्णय, जे 16 हंगामात घडलं नाही, ते पहिल्यांदाच पाहायला मिळणार; वाचाच






