S Sreesanth On Gautam Gambhir: भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीर नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी तो त्याच्या परखड मतांमुळे, तर कधी मैदानावरील बाचाबाचीमुळे चर्चेत असतो. अशात तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याचे चर्चेत येण्यामागील कारणही मैदानावरील विरोधी संघाच्या खेळाडूशी झालेली बाचाबाची आहे. यामुळे गंभीरवर मोठा आरोपही झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
बुधवारी (दि. 6 डिसेंबर) सूरतच्या लालाभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडिअम (Lalabhai Contractor Stadium, Surat) येथे लीजेंड्स लीग क्रिकेट 2023 (Legends League Cricket 2023) स्पर्धेतील एलिमिनेटर सामना पार पडला. या सामन्यात गुजरात जायंट्स विरुद्ध इंडिया कॅपिटल्स आमने-सामने होते. दरम्यान गौतम गंभीर आणि एस श्रीसंत (Gautam Gambhir And S Sreesanth) यांच्यात बाचाबाची पाहायला मिळाली. त्यांच्यातील वाद वाढण्यापूर्वीच सहकारी खेळाडू आणि पंचांनी मध्यस्थी केली आणि वाद मिटला. आता यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत याने गौतम गंभीरवर आरोपही (S Sreesanth also accused Gautam Gambhir) लावले आहेत.
Emotions are always running high, when you were very passionate about your game.
Sreesanth and Gambhir in an animated chat during the @llct20 Eliminator!#LegendsLeagueCricket pic.twitter.com/Qjz8LqC41l
— Nikhil 🏏 (@CricCrazyNIKS) December 6, 2023
काय म्हणाला श्रीसंत?
इंडिया कॅपिटल्स संघाने गुजरात जायंट्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, ही घटना घडली. जेव्हा गौतम गंभीर फलंदाजी करत होता, तेव्हा त्याची श्रीसंत याच्यासोबत वाद झाला. त्यानंतर वाद मिटवण्यासाठी पंचांना हस्तक्षेप करावा लागला. हा सामान इंडिया कॅपिटल्सने 12 धावांनी जिंकल्यानंतर, श्रीसंतने कोणत्याही कारणाशिवाय त्याला डिवचण्याबद्दल गंभीरवर टीका केली. आपल्या सहकारी खेळाडूंचा आदर न केल्यामुळे त्याच्यावर निशाणा साधत श्रीसंतने म्हटले की, गंभीर जे काही म्हणाला, त्यामुळे त्याला दु:ख झाले.
View this post on Instagram
श्रीसंत म्हणाला, “मिस्टर फायटरसोबत जे काही घडले, त्यावर मी फक्त काहीतरी स्पष्ट करू इच्छित होतो, जो नेहमी आपल्या सहकाऱ्यांसोबत कोणत्याही कारणाशिवाय भांडतो. तो आपल्या वरिष्ठ खेळाडूंचाही आदर करत नाही. ज्यात वीरू भाई (वीरेंद्र सेहवाग) आणि इतर अनेक खेळाडूंचा समावेश आहे. आजही तसेच घडले. कोणत्याही कारणाशिवाय, तो मला असे काही बोलत राहिला, जे खूपच असभ्य होते आणि असे होते, जे श्री गौतम गंभीरने म्हणायला नको होते.”
“मी फक्त तुम्हा सर्वांना हे सांगू इच्छितो की, माझी काहीच चूक नाहीये. मी फक्त हे स्पष्ट करू इच्छित होतो. तुम्हाला काही काळाने समजेलच की, गौतीने काय केले आहे. त्याने ज्या शब्दांचा वापर केला आणि क्रिकेटच्या मैदानावर ज्या गोष्टी लाईव्ह बोलला, ते स्वीकार्य नाहीये. त्याने अशा गोष्टी बोलल्या, ज्या त्याने बोलायला नको होत्या. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की, तुम्हा सर्वांना समजावे की, मी तुम्हा सर्वांना सांगेल की, तो नेमकं काय म्हणाला. जर तुम्ही सहकाऱ्यांचा आदर केला नाही, तर लोकांचे प्रतिनिधित्व करण्याचा काय अर्थ आहे?,” असेही पुढे बोलताना श्रीसंत म्हणाला.
अखेरीस श्रीसंत हेही म्हणाला की, “एवढंच नाही, तर लाईव्ह सामन्यात जेव्हा त्याला विराट (कोहली) याच्याविषयी विचारले जाते, तेव्हाही तो कधीच त्याच्याविषयी बोलत नाही. मला हे आणखी विस्तारात सांगायचे नाहीये. मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की, मी खूपच दुखालवलो गेलो आहे, माझे कुटुंब दुखावले गेले आहे आणि माझे चाहतेही दुखावले गेले आहेत. मी त्याला कधीच शिवी दिली नाही, पण तो काही ना काही म्हणत असतो, जे तो नेहमी करतो.”
सामन्याचा आढावा
या सामन्यात नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी करताना इंडिया कॅपिटल्स संघाने निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 223 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात जायंट्स संघाला 20 षटकात 7 विकेट्स गमावत फक्त 211 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना इंडिया कॅपिटल्सने 12 धावांनी खिशात घातला. (former cricketer s sreesanth reveals reason after on field spat with gautam gambhir says he does not respect seniors)
हेही वाचा-
INDvsSA: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कोच द्रविडचा भारतीय खेळाडूंना गुरुमंत्र; म्हणाला, ‘कठीण जागा, पण…’
पाकिस्तानचा प्रशिक्षक बनण्याच्या प्रश्नावर भारतीय दिग्गजाच्या उत्तराने माजवली खळबळ; म्हणाला, ‘मी तयार…’