Shane Watson On CWC23 Final : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपल्या अभियानाची सुरुवात 8 ऑक्टोबर रोजी एकमेकांविरुद्धच्या सामन्याने करणार आहेत. या विश्वचषकापूर्वी ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने ‘मिशन वर्ल्डकप’ या खास कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या खास एपिसोडमध्ये भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू शेन वॉटसन उपस्थित होते. यावेळी दोघांनी विश्वचषकाविषयी आपली मते मांडली.
काय म्हणाला वॉटसन?
शेन वॉटसन (Shane Watson) याने वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेविषयी मोठी भविष्यवाणी केली. त्याला विश्वचषकाचा अंतिम सामना खेळू शकणाऱ्या संघांचे नाव विचारले. यावेळी त्याने उत्तर देत ऑस्ट्रेलिया संघात मजबूत खेळाडू असल्यामुळे त्यांचे समर्थन केले.
तो म्हणाला, “विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियापुढे काही समस्या नक्कीच आल्या. काही खेळाडू दुखापतग्रस्त आणि वैयक्तिक कारणांमुळे संघातून बाहेर आहेत. अशात विश्वचषकासाठी निवडल्या गेलेल्या खेळाडूंना चांगल्याप्रकारे माहिती आहे की, या मोठ्या स्पर्धांमध्ये कशाप्रकारे पुढे जायचे आहे.”
भारताविषयी भाष्य
यावेळी वॉटसन याने भारतीय संघाच्या प्रदर्शनाविषयीही भाष्य केले. तो म्हणाला, “जर भारताचा प्रश्न असेल, तर विश्वचषकाचे आयोजन भारतात होत आहे. त्यामुळे नक्कीच भारतीय संघाला याचा फायदा मिळेल. कारण, त्यांना येथील परिस्थितीत इतरांपेक्षा चांगल्याप्रकारे माहिती असतील. याव्यतिरिक्त खासकरून भारताचे गोलंदाज सध्या जबरदस्त प्रदर्शन करत आहेत. कुलदीप यादव याच्या गोलंदाजीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे.”
‘अंतिम सामन्यात पोहोचण्याची क्षमता राखतो भारत’
“याव्यतिरिक्त भारताची वरची फळीही शानदार फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे ते विश्वचषकात नक्कीच अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्याची क्षमता बाळगतात. अशात मला वाटते की, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात एक रोमांचक अंतिम सामना होईल,” असेही वॉटसन म्हणाला.
तीन सामन्यांची मालिका
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात सध्या 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. यातील पहिल्या सामन्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. तसेच, दुसरा सामना 24 सप्टेंबर रोजी इंदोरमध्ये, तर तिसरा सामना 27 सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. (former cricketer shane watson said india vs australia final in icc 2023 odi world cup would be unique)
हेही वाचा-
भारतीय संघाचा ‘सूर्य’ 19 महिन्यांनी उगवला! ‘मिस्टर 360’ने केला खास पराक्रम, एकदा वाचाच
‘अतंत्य जड अंत:करणाने सांगावे लागत आहे…’, World Cup 2023मधून बाहेर होताच पाकिस्तानी गोलंदाज भावूक