भारतात आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी माजी कर्णधार सौरव गांगुली याने भारतीय संघाला मोलाचा सल्ला दिला आहे. त्याने यावेळी भारताचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल याच्याविषयी भाष्य केले आहे. गांगुलीच्या मते, भारतीय संघाला एका फिरकी गोलंदाजाचा शोध घ्यावा लागेल. कारण, आयसीसी स्पर्धांमध्ये युझवेंद्र चहल याला सातत्याने दुर्लक्षित केले जात आहे.
खरं तर, भारतात यावर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. असे असले, तरीही रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल फिरकीपटू म्हणून संघात आहेत. तसेच, आर अश्विन याचाही पर्याय आहे. मनगटी फिरकीपटू म्हणून चहल आणि कुलदीप या जागेसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. या दोघांची निवड वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी केली गेली आहे.
‘मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये युझवेंद्र चहलची कामगिरी शानदार’
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गांगुली म्हणाला की, भारतीय संघाला एका मनगटी फिरकीपटूची गरज भासेल. तो म्हणाला, “मला वाटते की, या विश्वचषकात भारताला एका मनगटी फिरकीपटूचा शोध घ्यावा लागेल. रवी बिश्नोई आणि कुलदीप यादव हेही आहेत, पण माहिती नाही युझवेंद्र चहलला मोठ्या स्पर्धांमध्ये कसे दुर्लक्षित केले जाते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. मग ते वनडे असो किंवा टी20. त्याच्यावर नजर ठेवणे गरजेचे असेल.”
चहलची कामगिरी
युझवेंद्र चहल याची 2019च्या विश्वचषकात भारतीय संघात निवड झाली होती. त्या विश्वचषकादरम्यान त्याने एकूण 8 सामने खेळले होते. त्यामध्ये चहलने एकूण 12 विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर 2021च्या टी20 विश्वचषकात त्याची निवड झाली नव्हती. त्याच्या जागी अक्षर पटेल आणि आर अश्विन यांना संधी दिली होती.
चहलच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने भारताकडून 72 वनडे सामने आणि 75 टी20 सामने खेळले आहेत. यादरम्यान वनडेत त्याने 5.26च्या इकॉनॉमी रेटने 121 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये 42 धावा खर्चून 6 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. तसेच, टी20त त्याने 8.13च्या इकॉनॉमी रेटने 91 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये 25 धावा खर्चून 6 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. (former cricketer sourav ganguly reacts on yuzvendra chahal being ignored for big tournaments)
महत्वाच्या बातम्या-
नाद करा पण स्टोक्सचा कुठं! ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर तुटून पडला कॅप्टन बेन, झळकावलं दीडशतक
‘आग लगे बस्ती में, बाबा अपनी मस्ती में’, विंडीज हारताच गेलने शेअर केला व्हिडिओ, चाहत्याची कमेंट चर्चेत