जगातील सर्वात मोठ्या टी20 लीगमध्ये गणल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या 16व्या हंगामासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी मोठी बातमी समोर येत आहे. या स्पर्धेपूर्वी पंजाब किंग्स संघाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी एका दिग्गज माजी भारतीयाला आपल्या ताफ्यात सामील केले आहे. या भारतीय खेळाडूने 15 कसोटी आणि 69 वनडे सामन्यात राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. अशात हा दिग्गज आयपीएल 2023मध्ये पंजाब किंग्स संघासाठी खास भूमिका बजावताना दिसू शकतो.
पंजाब किंग्समध्ये ‘या’ दिग्गजाची एन्ट्री
पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाने इंडियन प्रीमिअर लीग 2023 (Indian Premier League 2023) स्पर्धेपूर्वी माजी भारतीय फिरकीपटू सुनील जोशी (Sunil Joshi) यांना आपल्या ताफ्यात सामील केले आहे. खरं तर, जोशी यांना फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक (Sunil Joshi Spin Bowling Coach) म्हणून संघात सामील केले गेले आहे. पंजाब संघाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे.
We are excited to announce that former Indian left-arm spinner Sunil Joshi has been appointed as Punjab Kings Spin Bowling Coach. 🤩#SherSquad, let's give him a warm welcome! 🙏🏽#SaddaPunjab #PunjabKings #SunilJoshi @SunilJoshi_Spin pic.twitter.com/MN459TEuK5
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) January 16, 2023
आयपीएल 2008मध्ये झाले होते सामील
सुनील जोशी हे आयपीएलच्या पहिल्या हंगामाचा भाग बनले होते. आयपीएल 2008मध्ये ते खेळाडू म्हणून खेळले होते. त्या हंगामात ते रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा भाग होते. याव्यतिरिक्त जोशी हे भारतीय संघाचे निवडकर्ताही राहिले आहेत. पंजाब किंग्सने सुनील जोशी यांच्यापूर्वी माजी भारतीय फलंदाज वसीम जाफर यालाही संघाचा बाग बनवले होते. तो पुढील हंगामात फलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघात सामील होईल.
नवीन कर्णधारासोबत उतरणार पंजाब किंग्स
पंजाब किंग्स संघ नवीन हंगामात नवीन कर्णधारासोबत मैदानावर उतरणार आहे. आयपीएल 2023साठी झालेल्या मिनी लिलावापूर्वीच पंजाबने कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला होता. पुढील हंगामात शिखर धवन संघाची धुरा सांभाळणार आहे. यापूर्वी मयंक अगरवाल याला आयपीएल 2022मध्ये पंजाबचा कर्णधार बनवण्यात आले होते. तसेच, शिखर धवनही 202मध्ये पंजाब संघात सामील झाला होता.
आयपीएल 2023साठी पंजाब किंग्स
शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, राज बावा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, बलतेज सिंग, नॅथन एलिस, कागिसो रबाडा, राहुल चाहर, हरप्रीत ब्रार, सॅम करेन, सिकंदर रझा, हरप्रीत सिंग भाटिया, व्ही कावेरप्पा, मोहित राठी, शिवम सिंग. (former cricketer sunil joshi appointed spin bowling coach of punjab kings before ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी महिला गोलंदाजामुळे भिडले भारत आणि ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू, जाणून घ्या काय आहे भानगड?
याला म्हणतात जिगरा! चेंडू टाकताच पळत सुटला गोलंदाज, फलंदाजाला दाखवला तंबूचा रस्ता; पाहा व्हिडिओ