एकीकडे टी20 विश्वचषक अंतिम टप्प्यात आला असताना जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाचे बिगुल देखील वाजले आहे. 15 नोव्हेंबर रोजी आयपीएल 2023 साठी रिटेन केल्या जाणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली जाईल. तत्पूर्वी, पंजाब किंग्स संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी यावर्षी आपला संघ विजेतेपद जिंकण्यासाठी दावेदार असेल असे म्हटले.
आयपीएल 2023 रिटेन्शनआधी वाडिया यांनी आपल्या संघाच्या विजेतेपदाची आशा व्यक्त केली. ते म्हणाले,
“आम्हाला अपेक्षा आहे की नवा कर्णधार शिखर धवन व नवे प्रशिक्षक ट्रेव्हर बायलिस हे संघाला प्ले ऑफ्स आणि त्यानंतर विजेतेपद जिंकून देण्यात यशस्वी ठरतील. त्यांच्या अफाट अनुभवाचा फायदा संघाला होईल. आम्ही आमचा मुख्य संघ कायम ठेवू. संघाचे योग्य विश्लेषण होणे गरजेचे आहे.”
पंजाब किंग्सने आयपीएल 2023 च्या रिटेन्शनआधी मागील हंगामात संघाचे नेतृत्व केलेल्या मयंक अगरवाल याच्या जागी अनुभवी शिखर धवन याची नियुक्ती केली आहे. तर, मागे चार वर्षापासून संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या अनिल कुंबळे यांच्या जागी इंग्लंडला विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या ट्रेव्हर बायलिस यांना निवडले आहे. पंजाबची आयपीएलमधील आजवरची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली आहे. 2014 मध्ये संघाने अंतिम फेरी पर्यंतचा प्रवास केलेला. त्यानंतर त्यांना प्ले ऑफमध्ये जाता आले नाही.
आयपीएल 2023 पूर्वी पंजाब आपल्या संघातील अनेक प्रमुख खेळाडूंना वगळण्याची शक्यता आहे. यामध्ये मयंक अगरवाल, ओडेन स्मिथ व शाहरुख खान या बड्या नावांचा समावेश असेल. या खेळाडूंना सोडल्यानंतर शिल्लक राहिलेल्या मोठ्या रकमेतून ते बेन स्टोक्स, सॅम करन व कॅमेरून ग्रीन या अष्टपैलूंवर बोली लावू शकतात.
(They Will Change Our Fortune Ness Wadia Talk About Shikhar Dhawan And Bayliss)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘दुसऱ्याच्या दु:खात सुख शोधता तुम्ही…’, भारताच्या इरफानने पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर डागली तोफ, पण का?
आख्ख्या जगाने केले टीम इंडियाला ट्रोल, पण न्यूझीलंडच्या दिग्गजाकडून मिळाला सल्ला; म्हणाला, ‘धाडसी…’