---Advertisement---

‘त्याला टी२० संघात घेण्याची शक्यता नाममात्र!’ कुलदीप यादवच्या निवडीबाबत माजी दिग्गजाचे विधान

On: मंगळवार, ऑगस्ट 23, 2022 12:40 PM
Kuldeep-Yadav
---Advertisement---

कुलदीप यादवला टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळण्याच्या शक्यतेवर प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या आहेत. झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील कुलदीप यादवची कामगिरी लक्षात घेता, टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळण्याची शक्यता फारच कमी असल्याच माजी क्रिकेटपटू रितेंदर सिंग सोधी यांनी म्हटले आहे.

रितेंदर सिंग सोधी म्हणाले की, “कुलदीप यादवला टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळणे खूप कठीण आहे. या दौऱ्यात कुलदीप यादवकडून चांगली कामगिरी करून निवड समितीची मने जिंकण्याची अपेक्षा होती. त्याने चांगली गोलंदाजी केली पण त्याला अधिक सातत्य दाखवावे लागेल. तो थोडा निराश होईल कारण तो अधिक चांगला करू शकला असता. त्याची टी-२० विश्वचषक संघात निवड होते की नाही हे पाहणे बाकी आहे, परंतु यावेळी त्याची शक्यता फारच कमी दिसते”

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –

‘ही त्याच्या फलंदाजीतील खास गोष्ट आहे’, भारताच्या स्टार अष्टपैलूने शुबमनच्या फलंदाजीचे केले कौतुक 
..म्हणूनच इंडियन सर्वांच्या हृदयावर राज्य करतात! शतकवीर सिकंदरची भारतीय खेळाडूंनी थोपटली पाठ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---