2003च्या विश्वचषक स्पर्धेत (World Cup) भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या सेंच्युरियन सामन्याला भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आजही विशेष स्थान आहे. या सामन्यातील सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) (98) धावांची खेळी आजही चाहत्यांच्या आठवणीत आहे. तत्पूर्वी वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) या ऐतिहासिक सामन्याच्या काही मनोरंजक आठवणी शेअर केल्या, ज्यामध्ये त्याने शोएब अख्तरच्या घातक गोलंदाजीला तेंडुलकरने कसे प्रत्युत्तर दिले होते, हे सांगतले आहे.
वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “शोएब अख्तर म्हणाला होता की तो आमच्या टॉप ऑर्डरचा नाश करेल, पण सचिनने त्याला खतरनाक प्रत्युत्तर दिले. आम्ही अख्तरच्या वक्तव्याकडे फारसे लक्ष दिले नाही, पण तेंडुलकरच्या बॅटने त्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले.”
सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) भारताच्या डावाच्या सुरुवातीला आक्रमक अंदाजात फलंदाजी करत शोएब अख्तरच्या पहिल्याच षटकात 18 धावा ठोकल्या. त्याने शेवटच्या 3 चेंडूंवर सलग 6, 4, 4 धावा करत अख्तरची बाॅलिंग लाईन-अप पूर्णपणे उद्ध्वस्त केली. या सामन्यात तेंडुलकरने 75 चेंडूत 98 धावांची धमाकेदार खेळी खेळली होती.
वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) आठवण करून दिली की, तेंडुलकरला डावाच्या शेवटी क्रॅम्प्स आले होते. सेहवाग म्हणाला, “शाहिद आफ्रिदी तेंडुलकरला सतत त्रास देत होता, पण सचिन फक्त खेळावर लक्ष केंद्रित करत होता. त्याला माहित होते की त्याला क्रीजवर राहायचे आहे. सामन्यातील सर्वात संस्मरणीय क्षण म्हणजे तेंडुलकरने अख्तरच्या चेंडूवर अप्परकट षटकार मारला. मात्र, नंतर अख्तरने तेंडुलकरला 98 धावांवर बाद केले.”
महत्त्वाच्या बातम्या-
Duleep Trophy: रुतुराज गायकवाडच्या संघाची शानदार विजयाने सुरुवात!
वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टाॅप-5 गोलंदाज
क्रिकेटच्या नियमांची खिल्ली, चक्क थर्ड अंपायरशिवाय झाला आंतरराष्ट्रीय सामना!