Geoffrey Boycott On Rohit Sharma And Virat Kohli: उद्यापासून (20 जून) भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पण या सामन्यात भारताचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसणार नाहीत. कारण या दौऱ्यापूर्वीच दोन्ही खेळाडूंनी कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. यादरम्यान ज्यॉफ्री बॉयकॉट (Geoffrey Boycott) या माजी दिग्गज फलंदाजांने रोहित आणि विराटबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचे मत आहे की, इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत भारताला रोहित शर्मा (Rohit Sharma) पेक्षा विराट कोहलीची (Virat Kohli) उणीव जास्त भासेल.
भारत आणि इंग्लंड पुढील 6 आठवड्यांत 5 कसोटी सामने खेळतील आणि नवीन वर्ल्ड टेस्ट कसोटी चॅम्पियनशिप (WTC) सायकलमध्ये त्यांच्या मोहिमेची सुरुवात करतील.
बॉयकॉटने ‘डेली टेलिग्राफ’मधील त्यांच्या स्तंभात लिहिले, “विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीमुळे भारताच्या इंग्लंडला हरवण्याची शक्यता कमी होईल. कोहलीची निवृत्ती संघाचे सर्वात मोठे नुकसान आहे कारण तो तिन्ही फॉरमॅटमध्ये त्यांचा सर्वोत्तम फलंदाज होता.”
इंग्लंडच्या माजी कर्णधाराने कोहलीच्या अनुपस्थितीला मोठा धक्का म्हटले. बॉयकॉट म्हणाले, “तुमच्याकडे कितीही प्रतिभा किंवा अनुभव असला तरी, जर तुम्ही मानसिकदृष्ट्या ताजेतवाने नसाल आणि आव्हानासाठी तयार नसाल तर ते दमवणारे होते.”
ते म्हणाले, “रोहित एक उत्कृष्ट फलंदाज आहे. आपल्या सर्वोत्तम वेळेत एक उत्कृष्ट स्ट्रोक प्लेयर पण त्याला कोहलीइतके आठवले जाणार नाही कारण त्याचा कसोटी रेकॉर्ड चांगला होता पण विलक्षण नाही. गेल्या काही वर्षांत त्याच्या फलंदाजीमध्ये सातत्याचा अभाव होता. रोहित कधीही कोहलीसारखा नैसर्गिक ऍथलीट नव्हता आणि त्याला माहीत आहे की इंग्लंडमध्ये डावाची सुरुवात करणे खूप कठीण असू शकते कारण नवीन चेंडू जास्त फिरतो. यश मिळवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या आव्हानासाठी तयार राहावे लागते.”






