टी२० विश्वचषकात भारतीय संघ २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेतील त्यांच्या अभियानाला सुरुवात करणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाने सराव सामन्यांमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार विजय मिळवला. भारतीय खेळाडू या दोन सराव सामन्यांमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसले आहेत. असे असले तरी, इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसैन यांच्या मते पर्यायी योजनांची कमतरतेमुळे विश्वचषकाच्या बाद फेरीत कोणताही संघ भारताला हरवू शकतो.
हुसैनने स्काय क्रिकेटशी याबाबत चर्चा केली आहे. ते यावेळी म्हणाले की, ते जेतेपद जिंकण्याचे दावेदार आहेत. असे असले तरी, मी त्यांना प्रबळ दावेदार माननार नाही, कारण हा फॉर्मेट अनिश्चिततेचा आहे. या फॉर्मेटमध्ये कोणत्याही एका खेळाडूची ७०, ८० धावांची खेळी किंवा अवघ्या तीन चेंडूत सामना पालटू शकतो. त्यामुळे कोणीही बाद फेरीच्या सामन्यात भारताला हैराण करू शकते. हुसैनने आयसीसी स्पर्धेतील बाद फेरीतील भारताच्या खराब रेकॉर्डचाही उल्लेख केला आहे.
भारतीय संघाचे मागच्या काही वर्षातील आयपीसीच्या स्पर्धांमधील प्रदर्शन पाहिले, तर ते समाधानकारक नाही. भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात २०१३ मध्ये शेवटचे आयसीसी स्पर्धेतील जेतेपद मिळवले होते. त्यानंतर भारतीय संघ २०१५ मध्ये विश्वचषक, २०१६ टी-२० विश्वचषक आणि २०१९ विश्वचषकात उपांत्य सामन्यात पराभूत झाला आणि स्पर्धेतून बाहेर पडला होता.
याव्यतिरिक्त २०१७ चॅम्पियंस ट्रॉफी आणि यावर्षीच्या सुरुवातीला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्थेत भारत उपविजेता संघ ठरला होता. हुसैन याबाबत बोलताना म्हटले की, भारताचे आयसीसी स्पर्धेंमधील मागच्या काही वर्षांतील रेकॉर्ड चांगले नाही आणि हे असे काही आहे, ज्याला त्यांना समोरे जावे लागेल. जेव्हा ते बाद फेरीमध्ये खेळतात, तेव्हा भारतीय प्रेक्षक आणि चाहत्यांच्या अपेक्षांचा दबाव अजूनच वाढतो.
हुसैनच्या मते भारताकडे बाद फेरीच्या सामन्यात त्यांचे वरच्या फळीतील फलंदाज बाद झाल्यावर पर्यायी उपाय नाहीत. ते याबाबत म्हणाले की, जेव्हा ते महत्वाच्या वळणावर पोहोचतात, तेव्हा त्यांच्याकडे पर्यायी योजनांची कमतरता असते. तुम्ही मागच्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेला सामना पाहू शकता. अचानक तो सामना कमी धावसंखेचा बनला आणि त्यांच्याकडे कोणतीही पर्यायी योजना नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या –
कांगारूंचा विजयाने श्रीगणेशा; अखेरच्या षटकात दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय
भारत-पाकिस्तान सामन्यांत आत्तापर्यंत कुणाचे वर्चस्व, आकडे देतात धक्कादायक माहिती
‘सुपर १२’ मध्ये स्थान पक्के केलेल्या श्रीलंकेला मोठा झटका, ‘हा’ दिग्गज सोडणार संघाची साथ