---Advertisement---

दोनच दिवसांपुर्वी विराटशी तुलना होत असलेल्या क्रिकेटरला आता म्हणताय, दाखवा संघाबाहेरचा रस्ता

On: सोमवार, जुलै 13, 2020 12:30 PM
---Advertisement---

मुंबई । इंग्लंडचा फलंदाज जो डेन्ली हा धावांसाठी संघर्ष करताना दिसून येत आहे. वेस्टइंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने पहिल्या डावात 18 तर दुसऱ्या डावात 29 धावा केल्या आहेत. या निराशाजनक कामगिरीवर माजी कर्णधार मायकल वॉन याने नाराजी व्यक्त करत दुसऱ्या कसोटीतून त्याला बाहेर ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

या 34 वर्षीय खेळाडूने मागील आठ डावांमध्ये  40 पेक्षा जास्त धावा करण्यात यशस्वी ठरला नाही. त्याच्याऐवजी 22 वर्षीय जॅक क्रॉउली याला संघात स्थान देणे गरजेचे असल्याचे मत वॉन याने व्यक्त केले.

मायकल वॉन म्हणाला, “इंग्लंडने डेन्ली विषयी आता विचार करणे गरजेचे आहे. त्याच्या जागी क्रॉउली निश्चितपणे संघात खेळू शकेल. जो डेन्लीने मागील कसोटी सामन्यात एकसारखा खेळत आहे. त्याला अतिमेहनत करण्याची गरज आहे. सातत्याने एकसारखीच चूक करत आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा हा खेळाडू धावांसाठी संघर्ष करत आहे.”

मागील वर्षी पदार्पण करणाऱ्या डेन्लीने 15 कसोटी सामन्यात 29.53 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. चांगली सुरुवात केल्यानंतरही मोठी धावसंख्या उभारण्यात त्याला अपयश येत आहे. 2019 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 94 धावांची खेळी केली होती.

दोन दिवसांपुर्वीच डेन्लीची तुलना केंट क्रिकेटने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीशी केली होती.

51 कसोटीत इंग्लंड संघाचे नेतृत्व करणारा वॉर्न म्हणाला की, “डेन्ली खूप भाग्यशाली खेळाडू आहे . त्याला 15 कसोटी सामने खेळण्यास मिळाले. काही खेळाडूंना केवळ 8 कसोटी सामने खेळायला मिळाले. त्यात त्यांनी शतक ठोकले. मात्र डेन्लीला  अनेक संधी मिळाली. पण त्या संधीचे सोने करता आले नाही.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---