भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्याची बॉर्डर-गावसकर मालिका खेळली गेली. मात्र, या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी इंग्लंडचे माजी खेळाडू मायकल वॉन यांनी सोशल मीडियावरून एक भविष्यवाणी केली होती की, या मालिकेत भारतीय संघाचा 4-0 अशा फरकाने पराभव होईल. मात्र आता भारतीय संघाने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. त्यामुळे चाहते माइकल वॉन यांना सध्या ट्रोल करत आहेत.
भारतीय संघाला चार सामन्यातील पहिल्या कसोटी दारुण पराभव स्विकारावा लागला होता. हा सामना ऍडलेडमध्ये खेळला गेला होता. ज्यामध्ये भारतीय संघ 36 धावांवर सर्वबाद झाला होता. त्यांनंतर भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया संघाने 8 विकेट्सने पराभव केला होता. त्यानंतर भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेवर मायदेशात परतला. त्यामुळे भारतीय संघाच्या नेतृत्वाची माळ अजिंक्य रहाणेच्या गळ्यात पडली. त्यानंतर मेलबर्न येथे झालेल्या दुसर्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सने मात केली.
Told you all India would lose 4-0
If they lost in Adelaide … 😜😜😜— Michael Vaughan (@MichaelVaughan) January 19, 2021
त्यामुळे भारतीय संघाबाबत माइकल वॉन यांनी केलेली भविष्यवाणी खोटी ठरली. त्यानंतर भारतीय संघाच्या चाहत्यांनी माइकल वॉन यांचे ट्विट व्हायरल करताना त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली होती.
#AUSvsIND All of India to Mr. Michael Vaughan.
Some of the best cricket ever seen. pic.twitter.com/DUl4qjipTE— Chirag Sanghvi (@ChiragSanghvi2) January 19, 2021
@MichaelVaughan Mr Vaughan
What happen
YOU ARE ALSO SHOCKED LIKE PUNTER pic.twitter.com/ppanrsFPiN— Abhishek Verma (@Abhishe14425708) January 20, 2021
@MichaelVaughan Mr Vaughan
What happen
YOU ARE ALSO SHOCKED LIKE PUNTER pic.twitter.com/ppanrsFPiN— Abhishek Verma (@Abhishe14425708) January 20, 2021
@MichaelVaughan he he he
SHOCKED BY INDIA WIN
OR SCARED FOR ENGLAND WHITE WASH pic.twitter.com/QczcNQBWFb— Abhishek Verma (@Abhishe14425708) January 20, 2021
त्याचबरोबर या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सिडनीत खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाच्या बऱ्याच खेळाडूंना दुखापत झाली. तरी सुद्धा भारतीय संघ हा सामना अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरला. या सामन्यात हिरो ठरलेले आर अश्विन, हनुमा विहारी आणि जसप्रीत बुमराह हे दुखापतीमुळे उर्वरित सामन्यातून बाहेर पडले. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चौथा सामना अत्यंत रोमांच होणार हे सर्वांना माहित होते. परंतु, या सामन्यासाठी आवश्यक असणारे भारतीय संघातील प्रमुख खेळाडू अनुपस्थित होते.
तरी सुद्धा भारतीय संघाने हार न मानता. गाबा येथे झालेल्या चौथ्या सामन्यात नवोदित खेळाडूंना संधी दिली. त्यामध्ये शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन या खेळाडूंना संधी दिली. त्याचबरोबर भारतीय संघाने चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला पाचव्या दिवशी 3 विकेट्सने पराभूत केले. त्याचबरोबर गाबा या मैदानावर तब्बल 32 वर्षांनी पहिला विजय मिळवला. त्याचबरोबर 4 सामन्याची कसोटी मालिका 2-1 भारताने कसोटी मालिका जिंकत इतिहासिक विजय मिळवला.
Vaughan loves being trolled! 👌 https://t.co/7cvkjBo7Cn
— Satbir Singh (@thesatbir) January 19, 2021
— karanbir singh 🫶 (@karanbirtinna) January 19, 2021
Michael Vaughan to Kevin Peterson 😂🤣 pic.twitter.com/6Fi7P36hnK
— 🥳 JETHA LAL 🥳 (@_babuchak_1) January 19, 2021
#brisbanetest
IndiavsAustralia
Spiderman spidermanMeanwhile me to Michael Vaughan 😂 😂 pic.twitter.com/EzEcMC8rkQ
— आत्मनिर्भर किम जॉन उंग (Fan Account ) (@desikingkong4) January 19, 2021
त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांनी माइकल वॉन यांचे ट्विट व्हायरल केले आणि त्यांच्याविषयी मीम्स मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे.
https://twitter.com/7MSDIANDINU/status/1351441102352515074?s=19
या सामन्याबरोबरच भारताचा हा ऑस्ट्रेलिया दौरा देखील संपला आहे. आता बुधवारी (20 जानेवारी) भारतीय संघ मायदेशी परतेल.
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या डोळ्यात आले पाणी
…अन् ऑस्ट्रेलियन कोच लँगर भारतीयांबद्दल असे काही बोलले, की व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
टीम इंडियाच्या विजयाने गुगल बाबाही खुश! ऑनलाईन फटाके फोडत क्रिकेटप्रेमींना मोठं सरप्राईज