इंग्लंड महिला संघाची माजी क्रिकेटपटू सारा टेलर आता आगामी काळातील अबू धाबी टी-१० लीगमध्ये पुरुषाच्या संघाची प्रशिक्षक असणार आहे. सारा या लीगमध्ये टीम अबू धाबी संघाची सहाय्यक प्रशिक्षक असणार आहे. सारा क्रिकेटच्या इतहासातील सर्वश्रेष्ठ महिला यष्ठीरक्षकांपैकी एक आहे. पुरुषांच्या फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये प्रशिक्षक बनणारी पहिली महिला आहे. तिने यापूर्वी ससेक्स या पुरुषांच्या काउंटी क्रिकेट संघासोबत महिला तज्ञ प्रशिक्षकाच्या भूमिकेत काम केले आहे. अबू धाबी लीगमध्ये तिची नियुक्ती झाल्यानंतर तिच्या मते इतर महिला आणि मुलींवर याचा परिणाम होईल आणि त्या देखील प्ररित होतील.
या पदावर नियुक्ती झाल्यावर सारा म्हणाली की, “या फ्रेंचायझींच्या जगात आल्यावर, जेथे जगभरातील प्रशिक्षक आणि खेळाडू आहेत, मला विचार करायला आवडते की, एखादी युवा मुलगी किंवा पाहणारी एखादी महिला मला प्रशिक्षक सदस्यांसोबत पाहू शकते आणि त्यांना हे जाणवावे की, ही एक संधी आहे. जर ही करू शकते, तर मी का नाही.”
ती पुढे म्हणाली की, मला आशा आहे की, हे थोडे अजून सामान्य होईल. मी पहिली असू शकते, पण मी शेवटची नाही राहणार. प्रशिक्षण देणे मला आवडते आणि हे पुरुषांच्या मार्गावर गेल्यासारखे आहे, जे प्रत्यक्षात रोमांचक आहे.
साराने इंग्लंड महिला क्रिकेट संघाचे २२६ सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये तिने दोन आयसीसी महिला विश्वचषक, तसेच महिला टी-२० विश्वचषकही जिंकले आहे. ती आता टीम अबू धाबीचे मुख्य प्रशिक्षक पॉल फारब्रेससोबत सहाय्यकाच्या रूपात काम करणार आहे, ज्यांना दक्षिण अफ्रिका संघाचे माजी अष्टपैलू लांस क्लूजनर यांचा सहवास लाभला आहे.
लांस क्लूजनर सध्या टी-२० विश्वचषकात खेळत असलेल्या अफगाणिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. ससेक्ससोबत काम करता करता सारा काउंटीमध्ये बेड्स स्कूलमध्येही प्रशिक्षक आहे. ती आता फारब्रेस आणि क्लूजनरसोबत काम करण्यासाठीही उत्सुक आहे.
साराला टीम अबू धाबीचे महाप्रबंधक शेन अँडरसन यांचा व्हाट्सएपवर एक मेसेज आला होता. याविषयी बोलताना ती म्हणाली की, “हे अचानक आणि हैराण करणारे सरप्राइज होते.”
साराला व्हाट्सएपवर आलेल्या या मेसेजमध्ये विचारण्याता आले होते की, ती या पदासाठी इच्छुक आहे का ? यावर उत्तर देताना साराने सांगितले की, “मी वाट पाहू शकत नाही. जेव्हा मला समजले की स्टाफ कोण होता, त्याने या बातमीला अजूनच रोमांचक केले. हा एकदम येणारा क्षण होता आणि जर मी ही संधी सोडली असती, तर मी मुर्ख ठरले असते. मला येथे खूप काही शिकायला मिळणार आहे. शक्यतो त्यांच्याकडे मला सांगण्यासाठी खूप काही आहे आणि मी हे सर्व शिकायला जात आहे.”
त्यामुळे आता सारा ख्रिस गेल, पॉल स्टर्लिंग, लियाम लिव्हिंगस्टोन आशा अनेक स्टार पुरुष क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देताना दिसणार आहे.
अबू धाबीचा संपूर्ण संघ : ख्रिस बेंजामिन, डॅनी ब्रिग्स, अहमद डॅनियल, फिदेल एडवर्ड्स, मोहम्मद फराज़ुद्दीन, ख्रिस गेल, कॉलिन इनग्राम, मर्चेंट डी लँग, लियाम लिव्हिंगस्टोन, ओबेड मॅक्कॉय, रोहन मुस्तफा, नवीन-उल-हक, फिल साल्ट, पॉल स्टर्लिंग.
महत्त्वाच्या बातम्या –
बाबर आझम ‘कर्णधार’ कोहलीवर पडला भारी! टी२० मधील ‘तो’ मोठा विश्वविक्रम केला आपल्या नावे
आजपर्यंतचे सर्व सात टी२० विश्वचषक खेळणारे ६ खेळाडू, भारताच्या रोहित शर्माचाही आहे समावेश