मुंबई । येत्या ऑक्टोंबर महिन्यापासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्यास सुरुवात होणार आहे. मात्र कोरोनामुळे हा दौराही संकटात सापडला आहे. पण असे असले तरी या दौऱ्यासाठी इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने भारताचा वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला गुरुमंत्र दिला आहे. रोहित शर्मा वनडे सोबतच कसोटी मालिकेतही या दौऱ्यात सलामीची भूमिका बजावण्याची दाट शक्यता आहे.
नासिर हुसेन सोनी टेनवरील एका चॅट शोमध्ये म्हणाले की, “जर रोहित शर्मा कसोटी सामन्याचा सलामीवीर नसेल तर कदाचित मी वेगळा खेळ पाहिल. जर तुम्ही सध्याच्या क्रिकेटपटूंमधील आवडत्या खेळाडूबद्दल विचारले तर बरेच लोक रोहित शर्माचे नाव घेतील.”
“ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना रोहीत शर्माने पहिला अर्ध्या तास खेळपट्टीवर घालवावा. संयम दाखवावा. जर अर्धा तासापेक्षा जास्त वेळ खेळपट्टीवर टिकला तर त्याच्या बॅटमधून जास्तीतजास्त धावा निघू शकतात. त्याने सुरुवातीपासून आक्रमक भूमिका न वापरता आपली विकेट टिकवून खेळावे. त्यानंतर मोठी धावसंख्या करण्यास त्याला कोणीच रोखू शकणार नाही. त्याच्या बॅटमधून धावा झाल्या की, भारताला यश मिळू शकते.”
ते म्हणाले, “कसोटी क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या फलंदाजांना खेळपट्टीवर वेळ काढणे गरजेचे आहे. यासाठी फलंदाजीचे तंत्र देखील आवश्यक आहे. फलंदाजी करताना ‘ऑफस्टम्प’वर लक्ष देणे गरजेचे आहे. जसे की विराट कोहलीने मागील इंग्लंड दौऱ्यात जेम्स अँडरसनविरुद्ध खेळताना केले होते. त्यामुळेच इंग्लंडच्या पहिल्या दौऱ्यात मिळालेलं अपयश धुऊन काढण्यात विराट कोहली यशस्वी राहिला आणि हीच एका उत्तम कसोटीपटूची ओळख आहे.”
“भारतीय संघ जेव्हा विदेशी दौऱ्यावर जाईल आणि तिथल्या खेळपट्टीवर चेंडू स्विंग होत राहिला तर रोहित शर्माने अर्धा तास खेळपट्टीवर टिकावे.”
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना ब्रिस्बन येथे खेळवला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना ऍडलेड येथे होणार आहे. तिसरा आणि चौथा कसोटी सामना अनुक्रमे मेलबर्न आणि सिडनी येथे होणार आहे. कसोटीत सलामीचा फलंदाज म्हणून रोहित शर्माचा हा पहिला विदेशी दौरा असण्याची शक्यता आहे.
रोहित शर्मा भारताकडून क्रिकेट खेळताना 32 कसोटी सामन्यात 46.54 च्या सरासरीने 2141 धावा केल्या आहेत. त्यात 6 बहारदार शतके ठोकली आहेत. 224 वनडे सामन्यात 49.27 च्या सरासरीने 9114 धावा केल्या आहेत. यात 29 शतके ठोकली आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
अखेर त्या पंचांनी सचिनला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याची चूक केली मान्य
युवराज सिंगचा खुलासा, कित्येक वर्ष मला लागली नाही शांत झोप, पण…
सचिनला कर्णधार बनवणाऱ्या ‘या’दिग्गज खेळाडूंची आज ८१ वी जयंती