जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने पराभवाचं पाणी पाजलं होतं. किताबी सामन्यात भारतीय संघाच्या खराब प्रदर्शनाची चर्चा झालीच. मात्र, त्यासोबतच सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो रविचंद्रन अश्विन याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढण्याचा मुद्दा. एका मुलाखतीत आर अश्विन म्हणाला होता की, ड्रेसिंग रूममध्ये ‘मित्रां’ऐवजी ‘सहकारी’ असतात. अशात आता माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी याचे उत्तर दिले आहे.
काय म्हणाले शास्त्री?
भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी आर अश्विन (R Ashwin) याच्या टिप्पणीवर प्रश्न विचारला असता सरळ स्पष्ट प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “सहकारी नेहमीच राहतील, मग ते ड्रेसिंग रूम असो किंवा कॉमेंट्री बॉक्स. माझ्यासाठी, हे नेहमीच सहकारी होते. तुमचे असे काही मित्र असतील, जे सहकारी असतील. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की, कुणाचे किती जवळचे मित्र असतात? तुम्ही एखाद्याला विचारले, तर तो म्हणेल की, माझ्या आयुष्यात 4-5. मी माझ्या आयुष्यात 5 जवळच्या मित्रांसोबत खुश आहे. मला यापेक्षा जास्त काहीच नाही पाहिजे.” रवी शास्त्री पुढे बोलताना म्हणाले की, “मी जे काही म्हणत आहे, ते आहे सहकारी.”
अश्विन काय म्हणालेला?
सध्याच्या संघाविषयी बोलताना अश्विन म्हणाला होता की, “आताच्या भारतीय संघात कोणी मित्र नाहीत. हे सर्व सहकारी आहेत. एक काळ असा होता, जेव्हा संघातील सहकारी मित्र होते. हा खूप मोठा फरक आहे. आता इथे प्रत्येकाला स्वतःला पुढे जायचेय. त्यामुळे कोणाला विचारायला वेळ नाही की तू काय करतोय? हा एक एकाकी प्रवास आहे.”
सन 2021मध्ये सोडले होते प्रशिक्षकपद
खरं तर, 2021मध्ये रवी शास्त्री यांनी मुख्य प्रशिक्षकपद सोडले होते. यानंतर शास्त्री सातत्याने सामन्यांमध्ये समालोचन करू लागले. त्यांनी डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातही भाघ घेतला होता. (former head coach ravi shastri sensational reply to r ashwin teammates are colleagues remark)
महत्वाच्या बातम्या-
मोठ्या मनाचा नटराजन! गावातील खेळाडूंसाठी सुरू केली अकादमी, कार्तिकच्या हस्ते झाले उद्घाटन
कुणाचं कमबॅक, तर कुणाची पहिलीच वेळ, ‘या’ 5 खेळाडूंना विंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियात मिळाली जागा