भारताचा माजी विश्वचषक विजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं (Mahendra Singh Dhoni) भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसोबतच्या (Virat Kohli) त्याच्या नात्याबद्दल सांगितले, ज्याच्यासोबत त्यानं अनेक अविस्मरणीय क्षण घालवले आहेत आणि त्याच्या शानदार आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत फलंदाजी करताना अनेक भागीदारी केल्या आहेत. धोनीनं अलीकडेच हैदराबादमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्या नात्याचा खुलासा केला. विराटसोबतच्या नात्याबद्दल बोलताना धोनी म्हणाला की, जेव्हाही ते भेटतात तेव्हा ते एकमेकांशी संवाद साधतात.
कोहलीबद्दल बोलताना धोनी म्हणाला, “आम्ही भारतासाठी बऱ्याच काळापासून सोबत खेळलो आहे. जागतिक क्रिकेटचा विचार करता तो (कोहली) सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. मधल्या षटकांमध्ये त्याच्यासोबत खूप फलंदाजी करायचो आणि खूप मजा यायची कारण आम्हाला खेळात भरपूर दोन आणि तीन धावा मिळायच्या. त्यामुळे नेहमीच मजा यायची. असं नाही की आम्ही अनेकदा भेटतो, पण जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळते तेव्हा आम्ही खात्री करतो की आम्ही काही वेळ गप्पा मारतो. आम्ही काय चालले आहे याबद्दल बोलतो. हे आमचे नातं आहे.”
धोनीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं 2004 साली भारतीय संघामध्ये पदार्पण केलं होतं. धोनीनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. 90 कसोटी सामन्यात त्यानं भारतासाठी 38.09च्या सरासरीनं 4,876 धावा केल्या. यादरम्यान त्यानं 33 अर्धशतक, 6 शतक आणि 1 द्विशतक झळकावलं आहे. कसोटीत त्याची सर्वोच्च धावसंख्या 224 आहे.
350 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानं 87.56च्या स्ट्राईक रेटनं 10,773 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 50.57 राहिली. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानं 73 अर्धशतक आणि 10 शतक झळकावले. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 183 राहिली आहे. 98 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यानं 126.13च्या स्ट्राईक रेटनं 1,617 धावा केल्या. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 66 राहिली. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 2 अर्धशतक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
दीपिका कुमारीचं स्वप्न पुन्हा भंगलं, तिरंदाजीतील भारताचं आव्हान संपुष्टात
आर अश्विनचा फलंदाजीत कहर! सलामीला येऊन अवघ्या 30 चेंडूत फिरवला सामना
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी पाहा भारतीय संघाची संभावित प्लेइंग 11