भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील दुसरा सामना नुकताच पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा निराशाजनक पराभव करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. दोन्ही निराशाजनक पराभवामुळे भारताचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर (Gautam Gambhir) अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी गौतम गंभीरबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
खरे तर गौतम गंभीर (Gautam Gambhir) प्रशिक्षक बनताच भारतीय संघाने श्रीलंकेविरूद्धची एकदिवसीय मालिका गमावली. यानंतर बंगळुरू कसोटी सामन्यात भारतीय संघाचा डाव अवघ्या 46 धावांवर गारद झाला. पुणे कसोटी सामन्यातही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. गौतम गंभीर आता खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावणारा पहिला भारतीय ठरला आहे.
दोन्ही सामन्यात झालेल्या पराभवानंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले की, “दोन्ही कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव केला. गौतम गंभीर नुकताच भारताचा प्रशिक्षक झाला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने फॉलोअर्स असलेल्या संघाला प्रशिक्षण देणे सोपे नाही. प्रशिक्षक म्हणून गंभीरच्या कारकिर्दीतील हे सुरुवातीचे दिवस आहेत पण तो लवकरच शिकेल.”
गौतम गंभीरवर (Gautam Gambhir) अधिक टीका होत आहे. कारण त्याने त्याच्या इच्छेनुसार संपूर्ण सपोर्ट स्टाफची निवड केली होती. त्याने अभिषेक नायर आणि रायन टेन डेस्कोट यांची सहायक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली, तर मॉर्नी मॉर्केलची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय संघाला बराच काळ परदेशी प्रशिक्षक नव्हता पण गंभीरने परदेशी प्रशिक्षकाची नियुक्ती केली. असे असूनही संघाला ते यश मिळाले नाही. भारतीय संघाला तब्बल 12 वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमवावी लागली.
भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबई येथे खेळला जाणार आहे. दोन्ही संघ (1 ते 5 नोव्हेंबर) दरम्यान तिसऱ्या सामन्यासाठी आमने-सामने असणार आहेत. न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार आहे. तिथे भारत-ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ स्टार खेळाडूची भारताला उणीव भासणार, प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य!
“हे शाळेतल्या मुलांप्रमाणे खेळतात”, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूनं उडवली टीम इंडियाची खिल्ली
‘या’ कारणांमुळे मोहम्मद रिझवानला मिळालं पाकिस्तान संघाचं कर्णधारपद