मागील काही आठवड्यांपासून भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल खूपच चर्चेत आहे. यामागील कारण होते केएल राहुल याचा खराब फॉर्म. राहुल मागील काही महिन्यांपासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. त्यामुळे माजी खेळाडूंपासून ते चाहत्यांपर्यंत अनेकजण त्याच्यावर टीकास्त्र डागताना दिसले. भारताचा माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यानेही ट्विटरवर एकापाठोपाठ एक ट्वीट करत राहुलवर टीका केली होती. मात्र, शुक्रवारी (दि. 17 मार्च) वेंकटेश प्रसादने केएल राहुलचे कौतुक केले.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध केएल राहुलची वादळी खेळी
वानखेडे स्टेडिअमवर 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाकडून केएल राहुल (KL Rahul) याने कौतुकास्पद खेळी साकारली. तसेच, त्याने सर्व बाजूंनी वाहवा लुटली. तो यावेळी सलामीला न येता पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. त्यावेळी भारतीय संघाने 16 धावांवर 3 विकेट्स गमावल्या होत्या.
राहुलने तिथून दबावात खेळताना भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. त्यानंतर त्याने रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्यासोबत भागीदारी रचत संघाला विजय मिळवून दिला. राहुलने 91 चेंडूत नाबाद 75 धावांची शानदार खेळी साकारली. तसेच, जडेजाने 69 चेंडूत नाबाद 45 धावाही केल्या. वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) याने राहुलच्या खेळीचं कौतुक केलं.
7⃣5⃣* Runs
9⃣1⃣ Balls
7⃣ Fours
1⃣ SixThat was one brilliant knock in the chase from @klrahul 👌 👌 #TeamIndia | #INDvAUS
Watch 🎥 🔽https://t.co/ii33uhbPv1
— BCCI (@BCCI) March 17, 2023
प्रसादने ट्विटरवर राहुलचे फोटो शेअर करत लिहिले की, “केएल राहुलने दबावात चांगला संयम बाळगला आणि एक शानदार खेळी साकारली. कमालीची खेळी. रवींद्र जडेजानेही चांगली साथ दिली आणि भारतीय संघाला एक चांगला विजय मिळाला.”
Excellent composure under pressure and a brilliant innings by KL Rahul.
Top knock. Great support by Ravindra Jadeja and a good win for India.#INDvAUS pic.twitter.com/tCs74rBiLP— Venkatesh Prasad (@venkateshprasad) March 17, 2023
प्रसादच्या या ट्वीटवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी त्याची खिल्ली उडवली आहे, तर काहींना त्याला पाठिंबा दिला आहे. खरं तर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान राहुलला सातत्याने खराब कामगिरी करताना पाहून प्रसादने त्याच्यावर टीकास्त्र डागले होते. त्याने राहुलला देशांतर्गत क्रिकेट खेळून पुनरागमन करण्याचा सल्ला दिला होता. (former india fast bowler venkatesh prasad heaped praise india batter kl rahul under pressure knock australia 1st odi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘रोज उठा, अंघोळ करा, विलियम्सनचं कौतुक करा आणि झोपून जा’, सचिनची बरोबरी करताच भारतीय दिग्गजाकडून कौतुक
कॅप्टन्सी मिळताच पंड्या बनला घमंडी, चालू सामन्यात विराटला दिली वाईट वागणूक? व्हिडिओ पाहाच