---Advertisement---

एकवेळ फलंदाजांत दहशत असणारा भारतीय गोलंदाज बनलाय बराच कृश; चाहते म्हणाले…

On: रविवार, ऑगस्ट 21, 2022 7:15 PM
---Advertisement---

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव १५ ऑगस्ट रोजी देशभरात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.‌ केवळ भारतीयच नव्हे तर भारतावर प्रेम करणाऱ्या विदेशी लोकांनी देखील भारतीयांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अनेक आजी-माजी क्रिकेटपटू यात सामील होते. भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याने देखील आपल्या सोशल मीडिया हँडलवरून देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. मात्र, त्यावेळी त्याची तब्येत खूपच खराब झाल्यासारखे दिसत होते. चाहत्यांनी यावर चर्चा करण्यास सुरुवात केली असताना आता स्वतः प्रसादने स्पष्टीकरण दिले आहे.

 

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रसादने आपल्या ट्विटर हँडलवरून फोटो पोस्ट करत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, त्याच्या तब्येतीवरून चाहत्यांमध्ये बरीच चिंता पसरली होती. लोकांनी त्याला काय झाले असल्याचे प्रश्न विचारले होते. तसेच, तब्येतीची काळजी घेणेविषयी देखील सल्ला दिला होता. ‌‌त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणावर स्वतः प्रसाद याने पुढे येऊन उत्तर दिले आहे. त्याने ट्वीट करत लिहीले,

 

“मी एकदम ठीक आहे आणि माझे आरोग्य उत्तम आहे. मी अरुणाचल प्रदेश येथील तिरुवनमलाई येथे काही दिवस साधना करण्यासाठी गेलो होतो. तेथे माझा आहार खूपच हलका होता. त्यामुळे माझे वजन थोडे कमी झालेले. आता मी ऊर्जावान असून, लवकरच माझ्या मूळ रूपात येईल. तुम्ही व्यक्त केलेल्या चिंतेसाठी आभार.”

व्यंकटेश प्रसादला भारताच्या महान वेगवान गोलंदाजांपैकी एक मानले जाते. प्रसाद याने भारतासाठी आठ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना २९२ बळी मिळवले होते. तसेच काही काळ तो भारताच्या राष्ट्रीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षकही होता. सध्या भारताच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघाचे निवड करते म्हणून तो काम पाहतो.

महत्त्वाच्या बातम्या-

‘संजूची आणखी एखा विक्रमाला गवसणी!’ आता थेट प्रशिक्षक द्रविड अन् धोनीच्या यादीत झाला सामील

‘…पाकिस्तानने ५० षटके घेतली असती’, भारतावर टीका करणाऱ्यांना पाकिस्तानी दिग्गजाचाच टोला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---