सोमवारी (10 एप्रिल) आयपीएलमध्ये चाहत्यांना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यातील रोमांचक सामना पाहायला मिळाला. आरसीबीने घरच्या मैदानावर पहिल्यांदा फलंदाजी करताना 212 अशी धावसंख्या केली. मात्र, प्रत्युत्तरात लखनऊच्या फलंदाजांनी स्फोटक खेळी करत विजयी लक्ष्य गाठले. अखेरच्या चेंडूवर लखनऊ संघाने हा सामना एक गडी राखून आपल्या नावे केला. असे असले तरी लखनऊचा कर्णधार केएल राहुल याला आपला प्रभाव पडता आला नाही. यामुळे माजी भारतीय क्रिकेटपटूने त्याच्यावर टीका केली आहे.
विजयासाठी मिळालेल्या 213 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना लखनऊ संघाला आक्रमक सुरुवात हवी होती. मात्र, मेयर्स पहिल्याच षटकात बाद झाला. त्यानंतर दीपक हुडा व कृणाल पंड्या देखील आपली छाप पाडू शकले नाहीत. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मार्कस स्टॉयनिसने 29 चेंडूवर 65 धावा कुटल्या. मात्र, त्यावेळी कर्णधार राहुल एका बाजूने अत्यंत शांतपणे खेळत होता. बाराव्या षटकात 20 चेंडूवर 18 धावा करत तो बाद झाला. त्याच्या या संथ खेळीवर माजी भारतीय वेगवान गोलंदाज डोडा गणेश याने टीका केली. त्याने ट्विट करत लिहिले,
This innings from KL Rahul has to be the most hideous innings played in the history of IPL ever considering the context of the game. Man. What’s in his mind? Seriously. This can’t happen for so long at this level. It’s not school cricket #DoddaMathu #IPL2023 #CricketTwitter
— Dodda Ganesh | ದೊಡ್ಡ ಗಣೇಶ್ (Modi Ka Parivar) (@doddaganesha) April 10, 2023
‘सामन्याचा विचार करता ही एक घाबरवणारी खेळी होती. तुझ्या डोक्यात चालले तरी काय होते? या स्तरावर असे किती दिवस चालणार? हे काही स्कूल क्रिकेट नाही?’
चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इतर फलंदाजांनी धावांचा अक्षरशः पाऊस पडला. आरसीबीसाठी विराट कोहली, फाफ डू प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतके झळकावली. तर लखनऊ साठीदेखील स्टॉयनिसने 200 पेक्षा जास्तच्या तर पूरनने 300 पेक्षा जास्तच्या स्ट्राइक रेटने धावा चोपल्या. युवा आयुष बडोनी याने देखील काही आक्रमक फटके खेळत सामना रंगतदार बनवला.
(Former India Pacer Dodda Ganesh Slams KL Rahul For His Slow Inning Against RCB In IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबी अखेरच्या चेंडूवर पराभूत! लखनऊ सुपरजायंट्सने पार केले 213 धावांचे आव्हान, पूरन-स्टॉयनिस ठरले नायक
धोनीची स्टाईल मारायला निघालेला कार्तिक, पण शेवटच्या चेंडूवर बिघडवला सगळा गेम