भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात नुकत्याच खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघाने भारताचा 3-0 असा पराभव केला. भारताला घरच्या मैदानावर 3-0 ने पराभूत करणारा भारतीय क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंड हा पहिला संघ ठरला. पण भारतीय संघाच्या या खराब कामगिरीमुळे अनेक दिग्गज खेळाडूंनी भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी देखील कोचिंग स्टाफवर प्रश्व उपस्थित केला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी सुनील गावसकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. भारतीय कोचिंग स्टाफमध्ये स्पष्टतेचा अभाव असल्याचे गावसकरांचे मत आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. गावसकर यांनी प्रश्नार्थक स्वरात विचारले, भारतीय कोचिंग स्टाफमध्ये अभिषेक नायरची भूमिका काय आहे? रायन टेन डोशेटच्या भूमिकेबाबत स्पष्टतेचा अभाव असल्याचेही ते म्हणाले.
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांना अभिषेक नायर आणि रायन टेन डोशेटे यांच्या भूमिका वेगळ्या असल्याचे सांगण्यात आले. रायन टेन डोशेट हे सहाय्यक प्रशिक्षक आहेत, तर अभिषेक नायर फलंदाजी प्रशिक्षक आहेत. यानंतर गावसकर यांना हसू आवरले नाही. ते जोरात हसायला लागले.
मात्र, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) हे फलंदाजांना ऑस्ट्रेलियातील आव्हाने चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतील, अशी आशा सुनील गावसकर यांनी व्यक्त केली. गावसकर म्हणाले की, “गौतम गंभीरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अभिषेक नायर आणि रायन टेन डोशेटे यांच्यापेक्षा जास्त धावा केल्या. त्यामुळे गौतम गंभीरवर ऑस्ट्रेलियात अधिक जबाबदारी आहे.”
न्यूझीलंडविरूद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघ सातत्याने टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. याशिवाय भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) सातत्याने टीकेचे शिकार होत आहेत. दरम्यान आता सुनील गावसकरांनी भारतीय कोचिंग स्टाफवर प्रश्न उपस्थित केले.
न्यूझीलंडविरूद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) फायनलमध्ये खेळण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याच्या भारतीय संघाच्या आशा जिवंत असल्या, तरी बॉर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धेत भारतीय संघाला 4-0 असा विजय मिळवावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
BGT 2024-25; रोहित शर्माची जागा घेणार केएल राहुल?
10 वर्षात पहिल्यांदाच असे घडले, दिग्गज फलंदाज कोहलीला कसोटी क्रमवारीत मोठा झटका!
टी20 वर्ल्डकप गाजवणारा महाराष्ट्राचा पठ्ठा आता आयपीएलमध्ये खेळणार!