आयपीएल 2023 हंगाम दिल्ली कॅपिटल्ससाठी आतापर्यंत फारसा यशस्वी ठरलेला नाही. आतापर्यंत खेळलेल्या सहापैकी केवळ एका सामन्यात संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. हंगाम सुरू होण्याच्या आधीपासूनच दिल्लीचे खेळाडू दुखापतीशी झुंज देत आहेत. त्याचवेळी संघाचा आणखी एक युवा खेळाडू दुखापतग्रस्त होत हंगामातून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी भारताच्या एकोणीस वर्षाखालील संघाच्या माजी कर्णधाराला दिल्लीने आपल्या संघात स्थान दिले. याबाबतची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली.
🚨 NEWS 🚨@DelhiCapitals name Priyam Garg as replacement for Kamlesh Nagarkoti.
Details 🔽 #TATAIPL https://t.co/61x1hVfcmH
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2023
दिल्लीसाठी खेळणारा युवा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी हा दुखापतीमुळे या संपूर्ण हंगामात खेळू शकणार नाही. दिल्ली कॅपिटल्सकडून नागरकोटीला चालू हंगामात अजून एकही सामना खेळता आला नव्हता. संघाता तो दुखापतीतून सावरण्याची अपेक्षा होती. मात्र, असे होऊ शकले नाही. नागरकोटीच्या आयपीएल कारकिर्दीचा एकूण विचार केला, तर त्याने आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 57 च्या सरासरीने 5 विकेट्स घेतल्या आहेत. दिल्लीने या वेगवान गोलंदाजाला 1.10 कोटी रुपयांमध्ये यावर्षी रिटेन केले होते.
नागरकोठी बाहेर झाल्यानंतर आता दिल्लीने उत्तर प्रदेशचा कर्णधार तसेच 2020 अंडर 19 क्रिकेट विश्वचषकात भारताचे नेतृत्व केलेल्या प्रियम गर्ग याला संधी दिली. गर्ग याने मागील तीन हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघासाठी खेळला होता. त्याने या तीन वर्षात 21 सामने खेळताना केवळ 251 धावा करता आल्या होत्या. यादरम्यान त्याची सरासरी 15 इतकी खराब राहिलेली. त्यामुळे त्याला या हंगामात कोणीही खरेदीदार मिळाला नव्हता.
दिल्लीला सध्या भारतीय फलंदाजांचे अपयश प्रामुख्याने सतावत आहे. यश धूल, पृथ्वी शॉ व सर्फराज खान हे आतापर्यंत एकही चांगली खेळी करू शकले नाहीत. त्यामुळे गर्ग याला थेट अंतिम अकरामध्ये संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे.
(Former India U19 Skipper Priyam Garg Join Delhi Capitals As Kamlesh Nagarkoti Replacement In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चिन्नास्वामीवर आरसीबीचा पुन्हा जलवा! टॉपर राजस्थानला दिली 7 धावांनी मात, फाफ-मॅक्सवेल चमकले
सीएसकेचा नवा मि. कंसिस्टंट! कॉनवेच्या कौतुकास्पद सातत्याने घालाल तोंडात बोटे, आत्तापर्यंत गाजवलाय हंगाम