अनेकदा भारतात एखाद्या खेळाडूने एखाद्या सामन्यात चांगले प्रदर्शन केले नाही तर त्याला ट्रोल केले जाते. अशाच खेळाडूंपैकी एक म्हणजे रिषभ पंत. भारताची माजी कर्णधार अंजुम चोप्राला वाटते की रिषभ पंतला काही धक्क्यांमुळे टीकेला सामोरे जावे लागले कारण त्याने स्वतःसाठी खूप उच्च मापदंड सेट केला आहे. चोप्राच्या म्हणण्यानुसार, पंतकडून खूप अपेक्षा आहेत कारण त्याने अनेक मॅच-विनिंग कामगिरी केली आहे.
भारतासाठी २०१७मध्ये पदार्पण करणारा रिषभ पंत आज तिन्ही फॉरमॅटचा नियमित भाग बनला आहे. कसोटी सामन्यांमधील त्याची आकडेवारी उत्कृष्ट आहे आणि त्याने परदेशात भारताच्या अनेक विजयांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे चाहत्यांनी अशा खेळाडूंना ट्रोल करताना थोडा विचार करायला हवा असंही अंजूम चोप्राने म्हंटले आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा