माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्याचे समालोचक ‘आकाश चोप्रा’ने (Akash Chopra) वर्ष 2024 मधील 5 सर्वोत्तम टी20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांची निवड केली आहे. यामध्ये त्याने भारत आणि इंग्लंडच्या प्रत्येकी 2 आणि ऑस्ट्रेलियाच्या 1 फलंदाजाला यामध्ये स्थान दिले आहे. चोप्राने सांगितले की, फलंदाज निवडण्यासाठी त्याने किमान 10 डाव खेळले आहेत. बलाढ्य संघांविरूद्ध खेळल्या गेलेल्या महत्त्वाच्या डावांनाही महत्त्व देण्यात आले आहे. चोप्राने आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये ‘रोहित शर्मा’चे (Rohit Sharma) वर्षातील सर्वोत्कृष्ट टी20 फलंदाज म्हणून वर्णन केले आहे.
आकाश चोप्रा (Akash Chopra) म्हणाला, “आमचा कर्मावर विश्वास आहे, आमचा रोहित शर्मावर विश्वास आहे. त्याने 11 डावात 42च्या सरासरीसह 160च्या स्ट्राईक रेटने 378 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने विश्वचषकात कठीण परिस्थितीत संघाला वेगवान सुरुवात करून दिली. 2024 साठी तो माझा नंबर वन टी20 आंतरराष्ट्रीय फलंदाज आहे.”
चोप्राने दुसऱ्या क्रमांकावर फिल साल्ट (Phil Salt) आणि तिसऱ्या क्रमांकावर ‘संजू सॅमसन’ची (Sanju Samson) निवड केली आहे. साल्टने 17 सामन्यात 39च्या सरासरीसह 164च्या स्ट्राईक रेटने 467 धावा केल्या. साल्टने 25 षटकार आणि 44 चौकार मारले. सॅमसनने 3 शतके झळकावली, त्यापैकी 2 सलग आली. त्याने केवळ 13 सामन्यात 43च्या सरासरीसह 180च्या स्ट्राईक रेटने 436 धावा केल्या.
चोप्राने केवळ ‘ट्रेव्हिस हेड’चा (Travis Head) ऑस्ट्रेलियन फलंदाज म्हणून समावेश केला आहे. तो म्हणाला, “चौथ्या क्रमांकावर ट्रॅव्हिस हेड आहे, जो आमच्यासाठी डोकेदुखी बनला आहे. त्याने 15 सामन्यात 38च्या सरासरीसह 178च्या स्ट्राईक रेटने 539 धावा केल्या आहेत.”
पाचव्या क्रमांकावर, चोप्राने इंग्लंडच्या ‘जोस बटलर’ची (Jos Buttler) निवड केली आहे, ज्याने 13 डावात 462 धावा केल्या. दरम्यान तो दोनदा नाबाद राहिला. 84च्या सर्वोच्च धावसंख्येसह, त्याने 42च्या सरासरीसह 164च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. रीझा हेंड्रिक्स, इब्राहिम झद्रान आणि पाथुम निसांका यांच्या दमदार कामगिरीचे कौतुक केले पाहिजे, असेही आकाश चोप्राने कबूल केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; मेलबर्नच्या खेळपट्टीवर कोणाला मिळणार मदत? फलंदाज की गोलंदाज?
बिझनेसमुळे वादात सापडलेले 5 भारतीय क्रिकेटपटू, धोनी-कोहलीच्या नावाचाही समावेश
माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी दिला रोहित शर्माला गुरुमंत्र, खराब फॉर्ममधून दिलासा मिळणार?