सध्या भारताचा माजी क्रिकेटपटू अमित मिश्राची एक मुलाखत खूप चर्चेत आहे. मिश्रा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. क्रिकेट जगतात त्याचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं. मात्र आता त्यानं तरुणपणी वयात फसवणूक केल्याचं मान्य केलं आहे. मिश्रा यानं सांगितलं की, एकेकाळी त्याचं करिअर संपण्याच्या मार्गावर होतं. त्यामुळे त्यानं प्रशिक्षकाच्या सल्ल्यानं वय एक वर्ष कमी केलं होतं.
अमित मिश्रानं 2003 साली भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी त्यानं त्याचं वय 21 वर्षे असल्याचं सांगितलं होतं. परंतु तेव्हा त्याचं खरं वय 22 वर्ष होतं. मिश्रा म्हणाला, मला सांगायचं आहे की, माझ्या वयात एका वर्षाचा घोटाळा झाला होता, जो माझ्या प्रशिक्षकानं केला होता. प्रशिक्षकानं मला घरी बोलावलं आणि माझी कारकीर्द घडवण्यासाठी एक वर्षाचा वेळ मागितला.
अमित मिश्रा म्हणाला, “तेव्हा मला 19 वर्षांचा होण्यासाठी एक किंवा दोन वर्ष बाकी होते. माझे प्रशिक्षक म्हणाले, ‘आजपासून तुझं वय एका वर्षानं कमी झालं आहे आणि आता तुझ्याकडे 2 वर्षे उरली आहेत. मला धक्का बसला आणि विचारलं की हे कसं होऊ शकतं? मात्र नंतर मी त्यांचं पालन केलं.”
आयपीएलमध्ये अमित मिश्रा लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळतो. आयपीएल 2024 दरम्यान एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये रोहित शर्मानं मिश्राला त्याचं वय विचारलं होतं. यावर मिश्रानं आपलं वय 41 वर्ष असल्याचं सांगितलं. यावर रोहितला विश्वासच बसत नव्हता की तो त्याच्यापेक्षा फक्त 3 वर्षांनी लहान आहे. मिश्रा यानं सांगितलं की, त्याचं पदार्पण फार पूर्वी झालं होतं, त्यामुळे रोहितला त्याच्या वयावर विश्वास बसत नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या –
दिल्ली कॅपिटल्सला हवा ‘गौतम गंभीर’, ‘दादा’चा मुख्य प्रशिक्षकपदाचा दावा फेटाळला
एकेकाळी होते टीम इंडियाचे मॅचविनर खेळाडू…आता संधीसाठी झगडत आहेत! निवृत्ती हाच शेवटचा पर्याय
यष्टीरक्षक रिषभ पंत सीएसकेत घेणार धोनीची जागा? आयपीएल 2025 मध्ये होऊ शकतो मोठा फेरबदल