---Advertisement---

माजी भारतीय दिग्गज बेदी यांची प्रकृती चिंताजनक, करण्यात आली बायपास सर्जरी

On: मंगळवार, फेब्रुवारी 23, 2021 7:08 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांच्या छातीत वेदना होत असल्याने त्यांना दिल्लीतील एका रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर नुकतीच त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे. त्यामुळे लवकरच त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली जाऊ शकते.

७४ वर्षीय बेदी यांच्या जवळच्या व्यक्तीने पीटीआयला त्यांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “जितपत मला माहिती आहे, बेदींना हृद्यासंबंधी तक्रार होती. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार २-३ दिवसांपुर्वी त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली. यानंतर त्यांच्या तब्येतीत बराच सुधार झाला आहे. त्यामुळे आशा आहे की, त्यांना लवकरच रुग्णालयातून सुट्टी मिळेल.”

बेदी यांनी १९६६ ते १९७९ या कालावधीत भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व केले होते. यादरम्यान त्यांनी एकूण ६७ कसोटी सामने खेळले असून तब्बल २६६ विकेट्स घेतल्या होत्या. यात एक वेळा सामन्यातील एका डावात १० गडी बाद करण्याची कामगिरी त्यांनी केली होती. तर १४ वेळा विकेट्सचा पंचक केला होता. तसेच १० वनडे सामने खेळताना ७ विकेट्स घेतल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

तब्बल १४.२५ कोटींचा धनी ठरलेल्या ‘मॅक्स’भाऊचा फ्लॉप शो, नेटकऱ्यांनी विराटच्या आरसीबीला केलं ट्रोल

‘केरळ एक्सप्रेस’ सुसाट! लिलावात दुर्लक्ष केल्यानंतर श्रीसंतचा बळींचा पंचक, फ्रँचायझींना सणसणीत चपराक

‘तेव्हा’ इशांत पहिल्यांदा ढसाढसा रडला होता; पत्नी प्रतिमाने सांगितला किस्सा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---