भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर नेहमीच प्रत्येक मुद्द्यावर आपले परखड मत मांडण्यासाठी ओळखला जातो. तो त्याच्या विधानांमुळे चांगलाच चर्चेत असतो. कधी खेळाडूंचे कौतुक, तर कधी तो त्यांच्यावर आगपाखड करतानाही दिसतो. अशात त्याने भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पुढील टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेसाठी निवडले जावे, असे म्हटले आहे. तसेच, त्याने रोहितला संघाचा कर्णधारही बनवण्याचे भाष्य गंभीरने केले आहे.
खरं तर, मागील टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी आयपीएल सोडून कोणताही टी20 सामना खेळला नाहीये. आता प्रश्न उपस्थित होत आहे की, 7 महिन्यांनंतर खेळल्या जाणाऱ्या या विश्वचषकात या दोन खेळाडूंना निवडले जाईल की नाही? अशातच माहितीही समोर आली आहे की, बीसीसीआयने या दोन्ही खेळाडूंना आपल्या टी20 क्रिकेटच्या भविष्याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.
Gautam Gambhir wants Rohit Sharma to captain Indian team in upcoming T20 World Cup . He also mentioned that Rohit Sharma is a phenomenal leader 🫡🫡
Captain leader legend Hitman pic.twitter.com/xQeNd2sSGb
— Immy|| 🇮🇳 (@TotallyImro45) November 22, 2023
याविषयी एका युट्यूब चॅनेलशी बोलताना माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने म्हटले की, विराट सहजरीत्या निवडला जाईल, तसेच रोहित शर्माने जे विश्वचषक 2023मध्ये केले आहे, ते पाहता त्याला टी20 संघात घेतले पाहिजेच, पण त्यासोबतच त्याला कर्णधारही बनवले पाहिजे.
स्पोर्ट्सकीडा या क्रिकेट वेबसाईटशी बोलताना गंभीरने टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेविषयी म्हटले, “होय, त्या दोघांना निवडले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, माझी इच्छा आहे की, रोहित शर्माने टी20 विश्वचषकात भारताचे नेतृत्व करावे. हो, हार्दिक पंड्यानेही टी20त नेतृत्व केले आहे. मात्र, मला रोहितला टी20 विश्वचषकात नेतृत्व करताना पाहायचे आहे. असे करू नका की, रोहितला टी20 विश्वचषकात फलंदाज म्हणून खेळवले जाईल. रोहित एक शानदार लीडर आहे आणि त्याने या विश्वचषकात आपल्या बॅटिंगमधून दाखवले आहे. जर तुम्ही रोहितला निवडले, जे केले पाहिजे, तर विराट आपोआप निवडला जाईल. रोहित शर्माने जर ठरवलं की, त्याला टी20 विश्वचषक खेळायचा आहे, तर त्याने कर्णधार म्हणूनच खेळले पाहिजे.
रोहित शर्माची टी20 कारकीर्द
रोहित शर्मा याच्या टी20 कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 148 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 31.32च्या सरासरीने 3853 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 4 शतके आणि 29 अर्धशतकेही झळकावली आहेत. 118 ही त्याची टी20तील सर्वोत्तम धावसंख्या आहे. (former indian cricketer gautam gambhir picks this player as captain for t20 world cup 2024 said this on virat kohli future)
हेही वाचा-
पुढच्या वर्ल्डकपवेळी किती वयाचे असतील दिग्गज भारतीय खेळाडू? पाहा चक्रावणारे आकडे, एक तर चाळिशीत…
‘नासाच्या शास्त्रज्ञांनी सेट केला रोनाल्डोचा डायट’, रमीज राजाचा कहर शोध व्हायरल