---Advertisement---

वर्ल्डकप विजेत्या माजी क्रिकेटपटूचा लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय, तिसऱ्यांदा बनले खासदार

On: बुधवार, जून 5, 2024 10:21 AM
---Advertisement---

भारताचे माजी क्रिकेटपटू कीर्ति आझाद यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. ते तिसऱ्यांदा खासदार बनले आहेत. या आधी आझाद दोन वेळा बिहारच्या दरभंगा सीटवरून भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर निवडून आले होते. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते पश्चिम बंगालच्या वर्धमान दुर्गापूर सीटवरून तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आहेत.

कीर्ति आझाद दुसरे क्रिकेटपटू बनले आहेत, ज्यांनी तृणमूलच्या तिकीटावर लोकसभेची जागा जिंकली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणनंही तृणमूलच्या तिकीटावर विजय मिळवला आहे. दुसरीकडे, माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांनी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून टीएमसीच्या तिकिटावर विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते अधीर रंजन चौधरी यांचा पराभव केला आहे.

कीर्ति आझाद यांनी पश्चिम बंगालच्या वर्धमान दुर्गापूर सीटवरून मोठा विजय मिळवला. त्यांनी दिलीप घोष यांचा पराभव केला. कीर्ति आझाद यांना 7,20,667 मतं मिळाली, तर दिलीप घोष यांना 5,82,686 मतं मिळाली. अशाप्रकारे आझाद यांनी 37,981 मतांच्या फरकानं विजय मिळवला. या जागेवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सुकृति घोषाल तिसऱ्या स्थानावर राहिले. कीर्ति आझाद काँग्रेसमधून ममता बॅनर्जींच्या तृणमूल मध्ये दाखल झाले होते, जेथे त्यांना पक्षानं लोकसभेचं तिकीट दिलं.

कीर्ति आझाद यांच्या क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्यांनी भारतीय संघासाठी 7 कसोटी आणि 25 एकदिवसीय सामने खेळले आहेत. भारतानं कपिल देव यांच्या नेतृत्वात 1983 चा विश्वचषक जिंकला होता. कीर्ति आझाद त्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य होते. कसोटीमध्ये त्यांच्या नावे 135 धावा आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी 269 धावा केल्या आहेत. दोन्ही फॉरमॅटमध्ये मिळून त्यांच्या नावे 10 विकेट्स आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

युरोपियन देशांविरुद्ध एकही टी20 सामना जिंकू शकले नाही! साहेबांच्या नावे लज्जास्पद विक्रम कायम
पावसामुळे वाहून जाईल भारत विरुद्ध आयर्लंड सामना? आज न्यूयॉर्कमधील हवामान कसं असेल? सर्वकाही जाणून घ्या
टी20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात नेदरलँड्सचा शानदार विजय, इंग्लंडचं मोठं नुकसान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---