---Advertisement---

अश्विन टी२० वर्ल्डकप खेळणार का? भारतीय दिग्गजाने दिले जरा स्पष्टच उत्तर

On: शुक्रवार, ऑगस्ट 5, 2022 6:58 PM
R Ashwin
---Advertisement---

आगामी टी२० विश्वचषक यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे. यासाठी भारतीय संघात कोणकोणत्या खेळाडूंना स्थान मिळणार आणि कोणाचे तिकीट कापले जाणार? याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी अनुभवी फिरकीपटू अश्विन टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग असेल की नाही, याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मांजरेकर म्हणाले,

“सध्याचा फॉर्म पाहता युझवेंद्र चहलची निवड निश्चित दिसते. त्यानंतर अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आहेत, जे काही षटके गोलंदाजी करू शकतात. दीपक हुडाने गेल्या सामन्यात एक षटक टाकले होते. त्यानंतर आपल्याकडे कुलदीप यादव आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अश्विनची निवड ही अतिशय चांगली चाल होती, असे मला वाटते.”

मांजरेकर पुढे म्हणाले, “गेल्या काही वर्षांत अश्विनने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. अश्विन जेव्हा चहलसारख्या गोलंदाजासोबत गोलंदाजी करतो तेव्हा मला तो आवडतो. अश्विन धावा रोखण्यात तरबेज असून चहल बळी घेणारा गोलंदाज आहे. ते दोघे मिळून संघासाठी चांगली कामगिरी करतील.”

कुलचा या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्या जोडीमध्ये पहिल्यासारखी धार राहिलेली नाही, असे मांजरेकरांचे म्हणाले. ते म्हणाले, “मला वाटत नाही की ही जोडी आता एकत्र खेळू शकेल. विशेषत: टी२० क्रिकेटमध्ये या दोन्ही स्पेशालिस्ट फिरकीपटूंना संधी मिळणे कठीण आहे. एकतर अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल दिसतील किंवा अश्विन आणि चहल दिसतील. कुलदीप आणि चहल वनडे क्रिकेटमध्ये एकत्र दिसतील. मात्र, टी२० मध्ये मला असे होताना दिसत नाही.”

सध्या आशिया कप व टी२० विश्वचषक या दोन मोठ्या स्पर्धांवर भारतीय क्रिकेट संघाने लक्ष केंद्रित केले आहे. या दोन्ही स्पर्धा जिंकण्याचा मानस रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

ईशान नको, ऋतुराज नको अन् नको रिषभ! ‘या’ खेळाडूला द्या ओपनिंगला संधी

टी-ट्वेंटी विश्वचषकातील पराभवाचा बदला इंडिया घेणार, खुद्द पाकिस्तानचा खेळाडूच म्हणतोय…

ईशान नको, ऋतुराज नको अन् नको रिषभ! ‘या’ खेळाडूला द्या ओपनिंगला संधी

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---