विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी, भारतीय क्रिकेटवर दुःखाचे सावट पसरले आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूने जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या या जाण्याने माजी भारतीय क्रिकेटपटूंनी देखील शोक व्यक्त केला आहे.
बंगालचे माजी क्रिकेटपटू रवी बॅनर्जी यांचे बुधवारी (९ जून )रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. याबाबतची माहिती क्रिकेट संघातर्फे देण्यात आली आहे. रवी बॅनर्जी यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.
कोरोना सारख्या आजराला पराभूत करत ते घरी परतले होते.परंतु त्यानंतर त्यांना हृदविकराच्या झटक्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यांच्या पाठीमागे पत्नी सह दोन मुले आहेत.
बंगाल क्रिकेट संघाने माहिती देत म्हटले की,” बॅनर्जी नुकतेच कोरोनातून बाहेर आले होते. परंतु हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज (९ जून ) पहाटे त्यांनी शेवटचा श्वास घेतला आहे. ”
तसेच कॅब अध्यक्ष अविषेक डालमिया यांनी देखील त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत कुटुंबातील सदस्यांना धीर दिला आहे. त्यांचा जन्म ४ मार्चे १९५१ रोजी कोलकाता येथे झाला होता. ते उजव्या हाताने गोलंदाजी व उजव्या हाताने फलंदाजी करत असत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ते बंगाल संघाकडून सामने खेळले होते. त्यांच्या कारकिर्दीतील आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी १९६९-७० पासून ते १९७४-७५ मध्ये बंगाल संघासाठी १० प्रथम श्रेणी सामने खेळले होते. या १० सामन्यात त्यांनी १२.५५च्या सरासरीने ११३ धावा व ३३.४५च्या सरासरीने ११ विकेट्स घेतल्या.