राष्टप्रती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, 2025च्या पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये क्रीडा जगतातील अनेक दिग्गजांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. माजी भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) देखील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अलिकडेच अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तत्पूर्वी त्याच वेळी, भारतीय हॉकी संघाचा माजी गोलकीपर पीआर श्रीजेशला (PR Sreejesh) देखील पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
रविचंद्रन अश्विनसह इतर 4 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या यादीत, पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये चमकदार कामगिरी करणारा तिरंदाज हरविंदर सिंग, भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार आयएम विजयन आणि प्रसिद्ध पॅरा अॅथलेटिक्स प्रशिक्षक सत्यपाल सिंग यांनाही पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलियातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या मध्यभागी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने 106 सामन्यांमध्ये 537 विकेट्स घेतल्या. अश्विनने भारतीय संघासोबत 2011चा वनडे विश्वचषक आणि 2013ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. हा फिरकीपटू भारतीय संघासाठी सर्वात मोठा सामना जिंकणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे.
पद्म पुरस्कारांच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून सन्मानित खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन! त्यांच्या असाधारण कामगिरीचा सन्मान आणि उत्सव साजरा करताना भारताला अभिमान आहे. त्याचे समर्पण आणि चिकाटी खरोखरच प्रेरणादायी आहे. प्रत्येक पुरस्कार विजेता हा कठोर परिश्रम, आवड आणि नाविन्यपूर्णतेचा समानार्थी आहे, ज्याने असंख्य जीवनांवर सकारात्मक परिणाम केला आहे. ते आपल्याला उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्याचे आणि निःस्वार्थपणे समाजाची सेवा करण्याचे मूल्य शिकवतात.”
महत्त्वाच्या बातम्या-
पुनरागमनासाठी सज्ज होतोय विराट, माजी फलंदाजी प्रशिक्षकासोबत तयारी सुरू! VIDEO
IND vs ENG; कर्णधार जोस बटलरची एकतर्फी झुंज! भारतासमोर 166 धावांचे आव्हान
IND vs ENG; दुसऱ्या टी20 सामन्यातही शमीला संधी नाही, कधी होणार पुनरागमन?