जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) क्रिकेट जगताला कित्येक प्रतिभाशाली क्रिकेटपटू दिले आहेत. यात मुंबई इंडियन्सच्या इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या विस्फोटक फलंदाजांचाही समावेश आहे. भारत विरुद्ध इंग्लंड टी२० मालिकेतून या शिलेदारांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे आणि आपल्या प्रदर्शनाने सर्वांच्या मनेही जिंकली आहेत. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने इशान आणि सूर्यकुमार यांच्या यशामागे कोणाचा हात आहे? यासंबंधी आपले मत मांडले आहे.
सचिनने इशान आणि सूर्यकुमारच्या यशाचे श्रेय आयपीएल आणि मुंबई इंडियन्स संघाला दिले आहे. तो म्हणाला की, “भारतीय संघाची बेंच स्ट्रेंथ तयार करण्यात आयपीएलचे मोठे योगदान आहे. या लीगमध्ये युवा खेळाडूंना विश्वस्तरीय खेळाडूंसोबत किंवा त्यांच्या विरुद्ध खेळण्याची संधी मिळते. याचा त्यांना खूप फायदा होत आहे. माझ्या काळात मला वसीम अक्रमविरुद्ध खेळायची संधी मिळाली नव्हती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले असताना शेन वॉर्न, क्रेग मॅकडरमथ, मर्व ह्यूज अशा दिग्गजांचा मला अनुभव नव्हता. त्यामुळे मला त्यांच्या योजनांचा अभ्यास करावा लागत असे.”
पुढे बोलताना सचिन म्हणाला की, “मात्र आयपीएलमुळे देशांतर्गत पातळीवरील खेळाडूंनाही मोठमोठ्या दिग्गजांचा सहवास लाभतो. त्यामुळे त्यांच्या खांद्याला खांदा मिळवत युवा खेळाडू प्रगती करताना दिसत आहेत. मी चौथ्या टी२० सामन्यात पाहिले, सूर्यकुमार जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्सविरुद्ध सहजरित्या फलंदाजी करत होता. त्यावेळी अगदी समालोचकांनीही म्हटले होते की, सूर्यकुमारसाठी हे नवीन नाही. कारण तो यापुर्वी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळला आहे.”
“याच कारणामुळे इशान आणि सूर्यकमार भारताकडून खेळण्यासाठी पूर्णपणे तयार झाले आहेत. खरोखरच आयपीएलमुळे भारतीय संघाची बेंच स्ट्रेंथ खूप मजबूत झाली आहे. म्हणून मी इशान आणि सूर्यकुमारच्या यशाचे श्रेय आयपीएलचा आणि त्यांच्या मुंबई इंडियन्स संघाला देऊ इच्छितो,” असे शेवटी सचिनने म्हटले.
इशान आणि सूर्यकुमार मागील काही वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्त्व करत आहेत. त्यांनी आयपीएल २०२० मध्ये मुंबईला जेतेपद जिंकून देण्यात मोलाची भूमिका साकारली होती. त्यांच्या आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावरच त्यांना भारतीय टी२० संघात जागा मिळाली आहे. विशेष म्हणजे, संधी मिळाल्यानंतर त्यांनी अर्धशतके झळकावत स्वत:मधील कुवतही सिद्ध केली आहे.
भारत-इंग्लंडमध्ये चुरशीची लढत; फ्लॉप राहुल का अनुभवी धवन, कोणाला आजमावणार टीम इंडिया?
आर्चर पुढे असताना पहिल्याच चेंडूवर षटकार, इतकी हिम्मत कुठून आली? सूर्यकुमार म्हणतो…
INDvENG: मालिका विजयासाठी दोन्ही संघ उत्सुक; निर्णायक पाचव्या टी२० सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही






