---Advertisement---

‘तो’ही चाहर आणि चक्रवर्ती बनू शकतो; धोनीच्या एकेकाळच्या हुकमी एक्क्याला दिग्गजाचा पाठिंबा

Kuldeep Yadav, Virat Kohli, Rishabh Pant
---Advertisement---

भारताचा मर्यादित षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये या संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघात अनुभवी कुलदीप यादवचाही समावेश आहे. फिरकीपटू कुलदीपला संघातील स्थान टिकवून ठेवण्यात अडचणी निर्माण होत आहेत. मात्र मागील काही काळापासून एकदिवसीय आणि टी20 सामन्यांतून बाहेर असलेल्या कुलदीपकडे श्रीलंका संघाविरुद्ध स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी आहे.

कसोटी संघातून वगळल्यानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कुलदीपवर वेगवान गोलंदाजी विभागाची जबाबदारी असेल. त्याच्या भविष्याबाबत भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर वक्तव्य केले आहे.

त्यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, “मला वाटते श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी संघाची निवड उत्कृष्टपणे केली गेली आहे. कारण त्यात कुलदीप यादवचा समावेश आहे. कुलदीपला मागील बराच काळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळण्याची पुरेसी संधी मिळत नाही. आयपीएलमध्येही कुलदीपला जास्त सामने खेळण्यास मिळाले नाहीत.”

मांजरेकर पुढे म्हणाले की, “एक काळ असा होता जेव्हा कुलदीप सामना जिंकवणारा आणि खेळ बदलणारा गोलंदाज असल्याचे सिद्ध होत होते. अशा परिस्थितीत कुलदीपला श्रीलंका दौर्‍यावर स्वत:ला सिद्ध करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. राहुल चाहर आणि वरुण चक्रवर्ती यांच्यासारख्या खेळाडूप्रमाणे होण्याची क्षमता त्याच्यात आहे. कुलदीप आणि चहलची ‘कुलचा’ जोडी बर्‍याच दिवसानंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे.”

भारतीय संघाचा श्रीलंका संघाविरुद्ध एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना 13 जुलैला सुरू होणार आहे. तर 25 जुलैच्या टी20 सामन्याने या दौऱ्याचा अंत होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘देशासाठी कमीत कमी अजून एकतरी विश्वचषक खेळायचा आहे,’ अनुभवी यष्टीरक्षकाची इच्छा

‘ती’ गोष्ट घडली असती तर २००२ सालीच गांगुली खेळला असता अखेरचा सामना, स्वत: दादालाच होती खात्री

‘फरक पडतोच, जेव्हा खेळाडूंचा हिरोच त्यांचा प्रशिक्षक बनतो,’ श्रीलंकन लीजेंडकडून द्रविडची स्तुती

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---